चीनने अरुणाचल प्रदेशच्या सीमेपर्यंत पूर्ण केले तिबेटला जोडणार्‍या रेल्वेमार्गाचे काम !

तिबेटमधील ल्हासा आणि नायींगशी या शहरांना जोडण्यासाठी चीनने रेल्वेमार्गासाठी रुळ बनवण्याचे काम पूर्ण केल्याची माहिती चीनमधील प्रसारमाध्यमांनी दिली आहे. हा मार्ग छिंघाई-तिबेट पठाराच्या आग्नेय दिशेकडून जाणार आहे.

पाकमध्ये प्रतिवर्षी १ सहस्र हिंदू, शीख आणि ख्रिस्ती तरुणींचे होते धर्मांतर !

पाकमध्ये हिंदू, शीख, ख्रिस्ती आदी अल्पसंख्य समुदायातील १ सहस्र तरुणींचे प्रतिवर्षी अपहरण करून धर्मांतर ! पाकिस्तानातील स्वतंत्र मानवाधिकार आयोग सांगतो की, कोरोना महामारीच्या काळात दळणवळण बंदीमुळे या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

नेपाळला पुन्हा ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यासाठी आम्ही मरायला आणि मारायला सिद्ध ! – नेपाळचे माजी उपपंतप्रधान कमल थापा

हिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी काठमांडू येथे मोठ्या संख्येने हिंदूंनी मोर्चा काढला होता. त्याचे रूपांतर शेवटी सभेत झाल्यावर थापा बोलत होते.

(म्हणे) ‘इस्लामी देशात मंदिरे असतील, तर ती फोडली पाहिजेत !

आतंकवाद्यांचा आदर्श असलेल्या डॉ. झाकीर नाईक याच्याकडून पाकमधील हिंदूंचे मंदिर पाडल्याचे समर्थन ! भारतातील मुसलमान संघटना किंवा जभगरातील इस्लामी संघटना यांना याविषयी काय म्हणायचे आहे, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे !

रोम (इटली) मध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी केलेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे सहस्रो पक्षांचा मृत्यू

वर्ष २०२१ च्या स्वागतासाठी करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे मोठ्या प्रमाणात पक्षांचा मृत्यू झाला आहे. येथील रस्ते मृत पक्षांमुळे भरून गेले आहेत. पक्षी मित्र संघटना याविषयी गप्प का आहेत ?

अमेरिकेत गर्भवती महिलेची हत्या करून तिच्या पोटातून बाळ काढणार्‍या महिलेला फाशी होणार

अमेरिकेत वर्ष २००४ मध्ये लिसा मॉन्टेगोमेरी या महिलेने एका गर्भवती महिलेचा गळा आवळून तिची हत्या केली आणि त्यानंतर तिचे पोट चिरून बाळ पळवले होते.

मुंबईवरील आक्रमणाचा सूत्रधार आतंकवादी जकी-उर-रहमान लखवी याला पाकमध्ये पुन्हा अटक

पाकने आतंकवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी जकी-उर-रहमान लखवी याला पुन्हा एकदा अटक केली आहे. त्याला मुंबईवरील २६/११ च्या आक्रमणाच्या प्रकरणी जामिनावर सोडण्यात आले होते.

पाकच्या सिंध प्रांतात हिंदु महिलेचा मृतदेह झाडाला टांगलेला सापडला

पाकमध्ये हिंदूंचा वंशसंहार होत असतांना जगभरातील हिंदू निष्क्रीय !

पोलंडमध्ये शवपेट्यांच्या विज्ञापनामध्ये अर्धनग्न मॉडेल्सच्या वापरावरून चर्चकडून टीका

शवपेट्यांच्या विक्रीसाठी अशा प्रकारचे विज्ञापन करण्याची कल्पना ही केवळ विकृतीमुळेच सुचू शकते ! पाश्‍चात्त्यांमध्ये नैतिक मूल्यांचा किती अभाव आहे, हेच यातून लक्षात येते; मात्र तरीही भारतीय पाश्‍चात्त्यांना आदर्श समजतात !

बांगलादेशने १ सहस्र ७७६ शरणार्थी रोहिंग्यांची केली बेटावर रवानगी !

हे बेट भूभागापासून ३४ कि.मी.वर अंतरावर आहे. हे बेट पावसात नेहमी बुडून जात असल्याने बांगलादेशने बेटावर तटबंदी केली आहे. यासह तेथे घरे, रुग्णालये, मशिदीही बांधल्या आहेत.