हिंदु धर्माचा जगभर प्रसार करणारे जय लखानी कालवश

हिंदु धर्माचा जगभर प्रसार करणारे जय लखानी (वय ७२ वर्षे) यांचे ५ डिसेंबर २०२० या दिवशी लंडन येथे देहावसान झाले. जय लखानी यांचा जन्म केनियाच्या मोम्बासा येथे वर्ष १९४८ मध्ये झाला होता. त्यांचे बालपण टांझानियाच्या दारेसलाममध्ये गेले. वर्ष १९६४ मध्ये वयाच्या १५ व्या वर्षी ते लंडनला आले आणि पुढील शिक्षण घेतले.

फ्रान्सने बनवला इस्लामी कट्टरतावादाला रोखणारा मसुदा !

लवकरच कायद्यात रूपांतर करणार ! फ्रान्सचे करू शकतो, ते गेली ३ दशके जिहादी आतंकवाद आणि कट्टरतावाद यांमुळे पीडित असलेला भारत का करू शकत नाही ?

भाजपचे नेते विजय चौथाईवाले यांनी घेतली नेपाळच्या पंतप्रधानांची भेट !

भाजपच्या परराष्ट्र विभागाचे प्रमुख विजय चौथाईवाले यांनी नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांची भेट घेतली. या भेटीत सध्याची राजकीय परिस्थितीती आणि दोन्ही देशांतील संबंध यांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

आतंकवादी झकीऊर रेहमान लखवी याला प्रतीमहा दीड लाख रुपये खर्चासाठी देण्यास संयुक्त राष्ट्रांची पाकला अनुमती

संयुक्त राष्ट्रांनी एकीकडे आतंकवाद निपटण्याच्या गप्पा मारायच्या आणि दुसर्‍या बाजूने अशा प्रकारे आतंकवाद्यांना सहानुभूती दाखवायची, हे संतापजनक होय.

भारत पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करण्याची पाकला भीती

देहलीतील शेतकर्‍यांच्या आंदोलनावरून लक्ष वळवण्यासाठी भारत पुन्हा एकदा पाकमध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक’ करू शकतो, अशी भीती पाकमध्ये निर्माण झाली आहे.

ब्रिटनमध्ये दोघांवर अ‍ॅलर्जीमुळे कोरोना लसीचा दुष्परिणाम

ब्रिटनमध्ये फायजर-बायोएनटेकने विकसित केलेली कोरोनावरील लस देण्याला प्रारंभ झाला असतांना या लसीमुळे दोघांची प्रकृती बिघडली आहे. हे दोघेही जण  आरोग्य कर्मचारी आहेत.

तुर्कस्तानकडून सीरियातील १०० आतंकवाद्यांना काश्मीरमध्ये कारवाया करण्यासाठी प्रशिक्षण !

भारताने तुर्कस्तानशी सर्व प्रकारचे राजनैतिक आणि व्यापारी संबंध तोडून त्याच्यावर बहिष्कारच घातला पाहिजे आणि काश्मीरमधील आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकवर सैनिकी कारवाई केली पाहिजे !

चीनने नियंत्रणरेषेवर उभारल्या २० हून अधिक चौक्या !

यामागे चीनचा उद्देश येथील गस्त अधिक चांगली करून भारतावर लक्ष ठेवण्याचा आणि भारताला तत्परतेने प्रत्युत्तर देण्याचा असल्याचे म्हटले जात आहे.

इंडोनेशियामध्ये कोरोनावरील चिनी लसीला हलाल प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता

आता कोरोना लसीलाही हलाल प्रमाणपत्र म्हणजे कट्टरतेचा अतिरेकच होय ! याविरोधात तथाकथित पुरो(अधो)गामी तोंड उघडतील का ? हिंदूंनी त्यांच्या धर्मशास्त्रानुसार लसीची मागणी केली असती, तर हेच पुरो(अधो)गामी त्यांच्यावर तुटून पडले असते !

पाकमध्ये हिंदु आणि ख्रिस्ती तरुणींचा चिनी तरुणांसमवेत विवाह लावून त्यांना दासी बनवले जाते ! – अमेरिकेचा आरोप

पाक आणि चीन यांची ही युती चांगले काम कधीतरी करू शकेल का ? जगानेच आता या दोन्ही देशांच्या विरोधात बहिष्काराचे शस्त्र उगारणे आवश्यक आहे !