रोम (इटली) मध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी केलेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे सहस्रो पक्षांचा मृत्यू

पक्षी मित्र संघटना याविषयी गप्प का आहेत ?

रोम (इटली) – येथे वर्ष २०२१ च्या स्वागतासाठी करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे मोठ्या प्रमाणात पक्षांचा मृत्यू झाला आहे. येथील रस्ते मृत पक्षांमुळे भरून गेले आहेत. सहस्रोच्या संख्येने पक्षांचा मृत्यू झाला आहे. नववर्षासाठी हा अपशकून आहे का ?, अशीही चर्चा इटलीमध्ये केली जात आहे.

(सौजन्य : Indiatimes)

इटलीच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या आतिषबाजीमुळे या पक्षांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे पक्षांच्या अधिकारासाठी काम करणार्‍यांचे म्हणणे आहे की, फटाक्यांच्या आवाजामुळे घाबरून त्यांचा मृत्यू झाला.