पोलंडमध्ये शवपेट्यांच्या विज्ञापनामध्ये अर्धनग्न मॉडेल्सच्या वापरावरून चर्चकडून टीका

आमच्या शवपेट्या पाहून कुणीही प्राण सोडण्यास सिद्ध होईल ! – आस्थापनाचा दावा

शवपेट्यांच्या विक्रीसाठी अशा प्रकारचे विज्ञापन करण्याची कल्पना ही केवळ विकृतीमुळेच सुचू शकते ! पाश्‍चात्त्यांमध्ये नैतिक मूल्यांचा किती अभाव आहे, हेच यातून लक्षात येते; मात्र तरीही भारतीय पाश्‍चात्त्यांना आदर्श समजतात !

वॉर्सा (पोलंड) – युरोपमधील पोलंड देशामध्ये मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी सेवा पुरवणार्‍या ‘लिंडनेर’ या आस्थापनाने प्रतिवर्षीप्रमाणे नवीन वर्षाची दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. यात अर्धनग्नावस्थेत आणि अंतर्वस्त्र घालून काही मॉडेल्स शवपेट्या ओढत असल्याचे दाखवण्यात आले आहे. यावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. यास येथील चर्चकडूनही विरोध करण्यात आला आहे. ‘मृत्यू आणि शारीरिक संबंध यांचा असा संबंध जोडण्यात येऊन नये’, असे चर्चने म्हटले आहे. या आस्थापनाने स्पष्टीकरण देतांना म्हटले, ‘आमची उत्पादने, म्हणजेच शवपेट्या पाहून कुणीही प्राण सोडण्यास सिद्ध होईल,’ असा संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.’