बांगलादेशने १ सहस्र ७७६ शरणार्थी रोहिंग्यांची केली बेटावर रवानगी !

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशामध्ये म्यानमारमधून शरण आलेल्या १० लाखांहून अधिक रोहिंग्या मुसलमानांना बंगालच्या खाडीतील एका बेटावर स्थलांतरित करण्यात येत आहे. नुकतेच १ सहस्र ७७६ रोहिंग्यांना या बेटावर पाठवण्यात आले. यापूर्वीची दीड सहस्रांहून अधिक लोकांना तेथे पाठवण्यात आले आहे.

बांगलादेशने ८२५ कोटी रुपये खर्चून २० वर्षांपूर्वीच्या या बेटाची फेरउभारणी केली होती. येथे अनुमाने १ लाख रोहिंग्या स्थलांतरितांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात येत आहे. हे बेट भूभागापासून ३४ कि.मी.वर अंतरावर आहे. हे बेट पावसात नेहमी बुडून जात असल्याने बांगलादेशने बेटावर तटबंदी केली आहे. यासह तेथे घरे, रुग्णालये, मशिदीही बांधल्या आहेत.