(म्हणे) ‘इस्लामी देशात मंदिरे असतील, तर ती फोडली पाहिजेत !

आतंकवाद्यांचा आदर्श असलेल्या डॉ. झाकीर नाईक याच्याकडून पाकमधील हिंदूंचे मंदिर पाडल्याचे समर्थन !

  • डॉ. झाकीर इस्लामचा अभ्यासक समजला जातो. इस्लाममध्ये असे म्हटले आहे, असे त्याला वाटते, तर ते तसे नाही, हे अन्य मुसलमान अभ्यासकांनी पुढे येऊन सांगत डॉ. झाकीर याला विरोध केला पाहिजे !
  • भारतातील मुसलमान संघटना किंवा जभगरातील इस्लामी संघटना यांना याविषयी काय म्हणायचे आहे, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे !

कुआलालंपूर (मलेशिया) – जेव्हा महंमद पैगंबर काबा येथे परतले होते, तेव्हा त्यांनी तेथील असलेल्या ३६० मूर्ती फोडल्या होत्या. एका इस्लामी देशामध्ये एक मूर्ती किंवा प्रतिमा असू नये आणि जर असेल, तर तिला फोडली पाहिजे, असे विधान आतंकवाद्यांचा आदर्श आणि भारतातून पसार होऊन मलेशियामध्ये रहात असलेल्या डॉ. झाकीर नाईक याने केले आहे. त्याने एक व्हिडिओ प्रसारित केला असून त्यात हे विधान केले आहे.

पाकमध्ये धर्मांधांनी नुकतेच एक हिंदु मंदिर पाडून त्याला आग लावल्याच्या घटनेचे नाईक याने समर्थन केले आहे. ‘एका इस्लामी देशामध्ये हिंदु मंदिराला संमती दिली जाऊ शकत नाही’, असेही डॉ. झाकीर याने पुढे म्हटले आहे.