हुती बंडखोर आणि हमास यांनी केले इस्रायलवर आक्रमण !

प्रतिकात्मक छायाचित्र

तेल अवीव (इस्रायल) – येमेनच्या हुती बंडखोरांनी हमाससमवेत इस्रायलवर आक्रमण केले. हुतींनी दावा केला आहे की, त्यांनी इस्रायलवर हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांनी आक्रमण केले. येत्या काळात हे आक्रमण आणखी तीव्र होतील. इस्रायली सैन्याने हुतींनी क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण केल्याचे स्वीकारले; परंतु ही क्षेपणास्त्रे इस्रायलच्या ‘अ‍ॅरो क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणे’ने हवेतच नष्ट केल्याचे स्पष्ट केले.

हुती बंडखोरांचे प्रवक्ते याह्या सरिया याने आक्रमणाचे दायित्व स्वीकारले आणि म्हटले की, इस्रायलने आक्रमण थांबवले नाही, तर येत्या काळात इस्रायलवर आणखी आक्रमणे केली जातील. लाल समुद्रातील अमेरिकेच्या हॅरी ट्रुमन विमानवाहू जहाजावरही आम्ही दोन क्रूझ क्षेपणास्त्रे आणि दोन ड्रोन यांद्वारे आक्रमण केले. ‘आमच्या देशावर होत असलेली आक्रमणे जोपर्यंत थांबत नाही, तोपर्यंत लाल समुद्र आणि अरबी समुद्र येथील अमेरिकेच्या विनाशकारी जहाजांवरील आक्रमणे थांबणार नाहीत’, अशी चेतावणीही सरिया याने दिली आहे.