अमेरिकेत हिंदु पुजार्‍याला मारहाण

येथील शिवशक्ती पिठाचे ५२ वर्षीय पुजारी हरिश चंदेर यांना अज्ञात व्यक्तीने पाठलाग करून अमानुष मारहाण केल्याची घटना १८ जुलै या दिवशी येथील ‘फ्लोरल पार्क’ येथे घडली.

पाकच्या सिंध प्रांतातील विधानसभेत हिंदु मुलींचे अपहरण आणि धर्मांतर रोखण्यासाठी खासगी विधेयक एकमताने संमत

पाकच्या सिंध प्रांताच्या विधानसभेमध्ये सदस्यांनी हिंदु मुलींचे होणारे अपहरण आणि धर्मांतर यांविषयीचे सूत्र उपस्थित केले. या सूत्रावर सर्व पक्षांच्या सदस्यांनी चिंता व्यक्त करून ते रोखण्याची एकमुख मागणी केली.

लुंबिनी (नेपाळ) येथील गौतम बुद्ध यांच्या ५ मूर्तींची तोडफोड

लुंबिनी शहराजवळ गौतम बुद्ध यांच्या ५ मूर्तींची काही अज्ञातांनी १८ जुलै या दिवशी तोडफोड केली.

इराणचे ड्रोन पाडल्याचा अमेरिकेचा दावा

अमेरिकेच्या नौदलाने इराणचे ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. अमेरिकेने ड्रोन पाडल्याच्या आरोपाचे इराणने खंडण केले आहे. काही आठवड्यांपूर्वीच इराणने अमेरिकेचे ड्रोन पाडले होते.

अटक करून जामिनावर सोडायचे, हा आतंकवादी हाफीज सईदच्या अटकेचा तिसरा प्रयोग ! – उद्धव ठाकरे

‘पाकिस्तान सरकारने आतंकवादी हाफीज सईद याला अटक करायची आणि न्यायालयाने त्याला जामिनावर सोडून द्यायचे’, या नाटकाचे यशस्वी प्रयोग आतापर्यंत दोनदा केले गेले आहेत. आता दिवाळखोरीच्या सावटाखाली असलेल्या पाकने याच नाटकाचा तिसरा प्रयोग सादर केला

कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर स्थगिती कायम

पाकमध्ये अटकेत असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेविषयी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने १७ जुलैला दिलेल्या निर्णयात कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर यापूर्वी देण्यात आलेली स्थागिती कायम ठेवली.

आतंकवादी हाफीज सईद याला पाकिस्तानात अटक

पाकने हाफीजला केलेली अटक ही धूळफेकच आहे, हे शेंबडे पोरही सांगेल ! पाकला खरोखर आतंकवाद्यांवर कारवाई करायची असती, तर हाफीजला केव्हाच अटक करून फासावर लटकवले असते !

इंग्लंडच्या खेळाडूंनी ‘शॅम्पेन’ उडवल्यावर मुसलमान खेळाडू त्यांच्यापासून दूर गेले !

ब्रिटनमध्ये झालेल्या क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेमध्ये इंग्लंडने न्यूझीलंड संघाचा अंतिम सामान्यात पराजय करून विश्‍वचषक जिंकला. १४ जुलैला झालेल्या या सामन्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी आनंदोत्सव साजरा केला.

(म्हणे) ‘भारतातील जमावाकडून मुसलमानांच्या होणार्‍या हत्या लज्जास्पद !’ – ब्रिटीश खासदार जॉनसन अशवर्थ

भारतात मुसलमानांवर होणारी आक्रमणे आणि जमावाकडून होणार्‍या हत्यांसारख्या घटना अत्यंत चिंताजनक आहेत. या आक्रमणांत मुसलमानांचा मृत्यू होतो, काहींना गंभीर मारहाण करण्यात येते. या गोष्टीं चिंताजनक आहेत.

‘५ जी नेटवर्क’मुळे कर्करोग होण्याची शक्यता ! – रशियातील वाहिनीचा दावा

काही दिवसांपूर्वी ‘रशियन टाइम्स’ या वाहिनीच्या एका कार्यक्रमात तज्ञांनी ‘५ जी नेटवर्क’ हे मानव आणि प्राणी यांच्या जीवाला धोका आहे’, असे म्हटले आहे.


Multi Language |Offline reading | PDF