पंजाबमध्ये संघाच्या स्वयंसेवकाची हत्या करणार्‍या खलिस्तानवाद्यांना ब्रिटनमध्ये अटक आणि जामिनावर सुटका

भारतात कुणीही येऊन भारतीय नागरिकाची हत्या करून पुन्हा पसार होतो, हे भारताला लज्जास्पद !

महाराष्ट्र सरकार सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांवर सूड उगवत आहे ! – आमदार नितेश राणे, भाजप

राज्यशासनाने ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ कार्यक्रमाच्या अंतर्गत राज्यात ४७ सहस्र कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याचे सांगितले आहे; मात्र त्यांपैकी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत एकाही रुपयाची गुंतवणूक नाही…..

खालची रेवंडी येथे धूपप्रतिबंधक बंधारा तोडणार्‍यांवर कारवाई करा ! – रेवंडी ग्रामपंचायतीची मागणी

मालवण पतन विभागाने बांधलेला धूपप्रतिबंधक बंधारा तोडून, तसेच त्या ठिकाणच्या कांदळवन वृक्षाची बेसुमार तोड करणार्‍यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी रेवंडी ग्रामपंचायतीच्या वतीने मालवणचे तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्या निवेदनाद्वारे केली आहे.

ब्रिटनमधून गोव्यात आलेल्या प्रवाशांपैकी आतापर्यंत १६ प्रवासी कोरोनाबाधित

गोव्यात ८ डिसेंबरपासून ब्रिटनमधून ९०० प्रवासी आले. यांपैकी ४२५ जणांची आतापर्यंत कोरोनाशी संबंधित चाचणी करण्यात आली. यांपैकी १६ प्रवासी कोरोनाबाधित आढळले आहेत. या १६ प्रवाशांचे कोरोनाशी संबंधित नमुने ‘जिनॉमिक’ चाचणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत.

ऑनलाईन कर्ज देऊन फसवणूक करणार्‍या चौघांना अटक

एका चिनी नागरिकाचा समावेश : चिनी नागरिकांची अशी गुन्हेगारी पहाता भारतीय यंत्रणा निद्रिस्त आहेत, असेच लक्षात येते !

देवगड तालुक्यात अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणार्‍या युवकाला अटक

तालुक्यातील एका गावातील ३० वर्षीय मुलाने ८ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याची खळबळजनक घटना २४ डिसेंबरला घडल्याचे उघडकीस आले. याविषयी देवगड पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विरुद्ध ‘पोक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद करून संबंधित आरोपीस अटक केली आहे.

गोवा मांस प्रकल्प कधीही चालू करण्याच्या सिद्धतेत ! – गोवा मांस प्रकल्पाचे व्यवस्थापन

उसगाव, फोंडा येथील गोव्यातील एकमेव गोवा मांस प्रकल्प शासन चालू करण्याच्या सिद्धतेत आहे. हा प्रकल्प आम्ही कधीही चालू करू शकतो, अशी माहिती गोवा मांस प्रकल्पाचे महासंचालक प्रभुगावकर यांनी २ दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांना दिली.

मध्यप्रदेशात लव्ह जिहादविरोधी कायद्याला राज्य मंत्रीमंडळाची मान्यता

एकेक राज्यांनी असा कायदा करण्यापेक्षा केंद्र सरकारनेच तसा कायदा करणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !

हरमल समुद्रकिनार्‍यावर अमली पदार्थासहित आणखी एक नायजेरियी नागरिक कह्यात

अमली पदार्थविरोधी पथकाने २६ डिसेंबर या दिवशी एका छाप्यात हरमल येथे इमेका डेनियल या नायजेरियी नागरिकाला ७ लाख ६० सहस्र रुपयांच्या अमली पदार्थांसह कह्यात घेतले. त्याच्याकडे ३१.०१ ग्रॅम कोकेन आणि ४.४४ ग्रॅम एल्.एस्.डी. हे अमली पदार्थ आढळले.