बंगालमधील भाजप युवा मोर्चाच्या महिला नेत्याला ५ लाख रुपयांच्या कोकीनसहीत अटक

ज्या आरोपाखाली भाजपच्या नेत्याला अटक झाली आहे, ते आरोप गंभीर आहेत. यामागील सत्य समोर येईलच; मात्र भाजपनेही या आरोपांमधील सत्यता पडताळून जर यात तथ्य असेल, तर अशांवर कारवाई करणे अपेक्षित आहे !

पामेला गोस्वामी

कोलकाता (बंगाल) – राज्यातील पामेला गोस्वामी या भाजप युवा मोर्चाच्या महिला नेत्याकडे ५ लाख रुपये मूल्याचे १०० ग्राम कोकीन सापडल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीवरून त्यांना कोकीन पुरवणार्‍या प्रबीर डे यालाही अटक करण्यात आली आहे. गोस्वामी चारचाकी गाडीतून जात असतांना पोलिसांनी त्यांना कोकीनसहित पकडले. पामेला गोस्वमाी राजकारणामध्ये सक्रीय असल्याने त्यांना पोलीस सुरक्षाही पुरवण्यात आली होती.

जेव्हा गोस्वामी यांना अटक करण्यात आली, तेव्हा त्यांच्यासोबत सुरक्षारक्षकही होता. पामेला गोस्वामी बर्‍याच काळापासून अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा संशय पोलीस अधिकार्‍यांना होता.