सातारा येथे मशिदीच्या परिसरात भगवा झेंडा लावल्याने धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार

हिंदूंविरूद्ध एकत्र येण्यासाठी काहीना काही निमित्त शोधणारे धर्मांध !

सातारा, २० फेब्रुवारी (वार्ता.) – येथील रामकृष्णनगरमध्ये मशिदीच्या परिसरातील लोखंडी खांबावर भगवा झेंडा लावल्याने धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार बोरगाव पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, १९ फेब्रुवारी हा दिवस हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा दिनांकानुसार ‘जयंती महोत्सव’ म्हणून संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. १७ फेब्रुवारीला रात्री ९.१५ वाजता रामकृष्णनगर येथील युवक शिवजयंतीची सिद्धता करत होते. त्या वेळी दिलीप काळभोर यांनी मनात कोणतीही द्वेषभावना न बाळगता मशिदीच्या परिसरात असणार्‍या लोखंडी खांबावर भगवा झेंडा लावला; पण त्याचा उलटा अर्थ घेत तेथील काही धर्मांधांनी याविषयी उलटसुलट चर्चा करण्यास प्रारंभ केला. याविषयी बोरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विजय साळुंखे यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात या घटनेविषयी तक्रार नोंद केली. (अनेक ठिकाणी मशिदींमधून ५ वेळा अवैधपणे लावलेल्या भोंग्यांमधून मोठ्या आवाजात नमाजपठण करण्यात येते, त्याविषयी पोलीस स्वतःहून अशा प्रकारची तक्रार कधी प्रविष्ट करतात का ? – संपादक)