पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी बंजारा समाजाचे मुख्यमत्र्यांना निवेदन  

यवतमाळ – पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी वनमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांची विरोधक सातत्याने करत असलेली अपकीर्ती थांबबावी, यासाठी बंजारा समाजाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सहस्रो स्वाक्षर्‍यांचे निवेदन दिले. १६ फेब्रुवारी या दिवशी जिल्ह्यातील उमरखेड, दारव्हा, दिग्रस येथे मोर्चाही काढण्यात आला होता.