अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान ४ आठवडे व्हावे ! – देवेंद्र फडणवीस

मुंबई – लोकांचे प्रश्‍न मांडण्यासाठी अधिवेशन किमान ४ आठवडे व्हायला हवे, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मांडले. जर सरकारने अधिवेशनाचा कालावधी अल्प केला, तर प्रश्‍नांपासून पळ काढण्यासाठी सरकारचा हा प्रयत्न असेल, असा आरोप त्यांनी केला आहे.

 (सौजन्य : News18 Lokmat)

संजय राठोड आणि पूजा चव्हाण प्रकरणी पोलिसांवर सरकारचा दबाव असल्यामुळे पडताळणी व्यवस्थित होत नाही, असा आक्षेप त्यांनी या वेळी घेतला. १९ फेब्रुवारी या दिवशी ते माध्यमांशी बोलत होते.