कृषी कायदे रहित करण्यासाठी शेतकर्‍यांकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका

‘सध्या केंद्र सरकारने लागू केलेले कायदे हे शेतकर्‍यांच्या हिताचे नसून भांडवलदारांच्या हिताचे आहेत’, असे या याचिकेत म्हटले आहे.

हिंदु जनजागृती समितीचा गोव्यातील हिंदुत्वनिष्ठ उद्योजकांसाठी ऑनलाईन परिसंवाद

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच गोवा राज्यातील हिंदुत्वनिष्ठ उद्योजकांसाठी ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात श्री. मनोज खाडये यांनी उद्योजकांना ‘धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर माहिती सांगितली.

समाजाला धर्मशिक्षण देऊन योग्य दिशा देणे आवश्यक ! – सौ. लक्ष्मी पै, सनातन संस्था

मंगळुरू (कर्नाटक) येथील ‘युथ ऑफ जी.एस्.बी’ यू ट्यूब चॅनलवर ऑनलाईन
आयोजित केलेल्या ‘धर्मो रक्षति रक्षितः’ कोंकणी भाषेतील कार्यक्रमात सनातन संस्थेचा सहभाग

कच्चुरू-उडुपी (कर्नाटक) येथील श्री नागेश्‍वर भजनी मंडळात प्रथमोपचाराविषयी ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन

कच्चुरू-उडुपी येथील श्री नागेश्‍वर भजनी मंडळाच्या सदस्यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतीच ‘प्रथमोपचार’विषयी ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन करण्यात आले.

बंगालच्या ओंकारनाथ मठाच्या भूमीवर बांधकाम व्यावसायिकाचे अतिक्रमण !

बंगालमध्ये आधीच कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले असतांना मठावर अतिक्रमण होणे आणि मठाधिपतींना धमक्या मिळणे यांवर चाप बसण्याची शक्यता अल्पच आहे.

भाजपचे नेते विजय चौथाईवाले यांनी घेतली नेपाळच्या पंतप्रधानांची भेट !

भाजपच्या परराष्ट्र विभागाचे प्रमुख विजय चौथाईवाले यांनी नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांची भेट घेतली. या भेटीत सध्याची राजकीय परिस्थितीती आणि दोन्ही देशांतील संबंध यांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

(म्हणे) ‘गोमांसाची टंचाई निर्माण करून गोव्यातील धार्मिक सलोखा भाजप बिघडवत आहे !’

कर्नाटकच्या विधानसभेने ‘कर्नाटक पशूधन हत्या प्रतिबंध आणि संवर्धन’ हे गोहत्याबंदी विधेयक संमत केल्याने गोव्यातील काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड या पक्षांना पोटशूळ उठला.

सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सकपदी पुन्हा डॉ. श्रीमंत चव्हाण

जिल्हा शल्यचिकित्सकपदी नियुक्ती झाल्यानंतर केवळ दोन मासांतच डॉ. श्रीमंत चव्हाण यांचे तडकाफडकी स्थानांतर करण्यात आले होते. याच्या विरोधात स्थानिक सामाजिक संस्था, तसेच काही राजकीय पक्ष यांनी आवाज उठवत हे स्थानांतर रहित करण्याची मागणी केली होती.

आतंकवादी झकीऊर रेहमान लखवी याला प्रतीमहा दीड लाख रुपये खर्चासाठी देण्यास संयुक्त राष्ट्रांची पाकला अनुमती

संयुक्त राष्ट्रांनी एकीकडे आतंकवाद निपटण्याच्या गप्पा मारायच्या आणि दुसर्‍या बाजूने अशा प्रकारे आतंकवाद्यांना सहानुभूती दाखवायची, हे संतापजनक होय.

ममता बॅनर्जी यांनी नड्डा यांच्या वाहनताफ्यावरील आक्रमणाविषयी क्षमा मागावी ! – बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड

राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिघडलेली आहे. बंगालची सुरक्षा करणे माझे दायित्व आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना राज्यघटनेचे पालन करावेच लागणार आहे.