मंगळुरू (कर्नाटक) येथील ‘युथ ऑफ जी.एस्.बी’ यू ट्यूब चॅनलवर ऑनलाईन
आयोजित केलेल्या ‘धर्मो रक्षति रक्षितः’ कोंकणी भाषेतील कार्यक्रमात सनातन संस्थेचा सहभाग
मंगळुरू (कर्नाटक) – आज हिंदू धर्मशिक्षणाच्या अभावामुळे धर्माचरणापासून दूर गेल्याचे लक्षात येते. धर्मनिरपेक्ष शासनपद्धतीमुळे आपल्या अभ्यासक्रमासह सर्वच स्तरांतून धर्माला काढण्यात आले. याचसमवेत देवस्थानांमध्येही धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था नसल्याने संपूर्ण हिंदू समाज याचे दुष्परिणाम भोगत आहे. आज युवा वर्गाला धर्माचरणाविषयी शंका असून त्यांना योग्य प्रकारे उत्तर देणारे कुणीही नाही. त्यामुळे नास्तिकवाद आणि पाश्चात्त्यांचे अंधानुकरण वाढत आहे. असे असले तरी अजूनही वेळ गेलेली नाही. उत्तरदायी नागरिक म्हणून आपण सर्वांनी जागरूक होऊन समाजाला धर्मशिक्षण देण्यासह योग्य दिशा देणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण सर्वांनी कृतीशील झाले पाहिजे, असे आवाहन सनातन संस्थेच्या सौ. लक्ष्मी पै यांनी केले. येथील ‘युथ ऑफ जी.एस्.बी’ यू ट्यूब चॅनेलवर नुकताच ‘धर्मो रक्षति रक्षितः’ या कोंकणी भाषेतील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात रा.स्व. संघाचे प्रबोधन संयोजक श्री. प्रकाश पै हेदेखील ‘अतिथी’ म्हणून सहभागी झाले होते. श्री. गोपालकृष्ण भट यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
विशेष
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह) ५ सहस्र ७०० जणांनी पाहिले. या कार्यक्रमानंतर अनेकांनी ‘चांगला कार्यक्रम’ म्हणून अभिप्राय व्यक्त केला. तसेच ‘प्रत्येक देवस्थानामध्ये धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था केली पाहिजे’, असेही म्हटले.
वैशिष्ट्यपूर्ण
हा कार्यक्रम पहाणार्या एका धर्मप्रेमींनी लगेच संपर्क करून कोंकणी भाषेत धर्मशिक्षण वर्ग चालू करण्याची मागणी केली, तसेच एका प्रवचनाचे आयोजनही केले.

नागपूर येथे हिंदु महिलेच्या धर्मांतराचा प्रयत्न; दर्ग्याच्या बाबासह ६ जणांवर गुन्हा नोंद !
तळलेल्या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !
राष्ट्र आणि धर्मनिष्ठ युवा निर्मितीसाठी सज्जनगड येथे पार पडले ‘हिंदु धर्मसंस्कार शिबीर’
महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ त्वरित रहित करावा – अधिवक्ता श्री. विश्वास पानसे, प्रमुख विश्वस्त, मार्तंड देवस्थान, जेजुरी
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ कायदा रहित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाचे ठिकठिकाणी निवेदन