वीररत्न बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू यांच्या समाधीवरील छताचा आज दुर्गापण सोहळा

स्वराज्य निर्माण करण्याच्या कार्यात वीररत्न बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली.

सोलापूर येथे महानगरपालिकेच्या वतीने प्लास्टिक मुक्ती अभियान

सोलापूर शहरातील विविध दुकानदारांनी प्लास्टिकच्या पिशवीचा उपयोग न करता कापडी पिशवीचा उपयोग करून पर्यावरणाचे रक्षण करावे.=उपायुक्त धनराज पांडे

शिवकवच कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने किल्ला स्पर्धेचे बक्षीस वितरण !

वखारभाग येथील शिवकवच कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने दीपावलीच्या निमित्ताने भव्य किल्ला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यातील विजेत्यांना नुकतेच भाजप आमदार श्री. सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

कोल्हापूर येथे मुलाच्या वाढदिवसानिमित्त विनाअनुमती क्रिकेट स्पर्धा भरवून चिअर गर्ल्स नाचवल्या ; दोघांवर गुन्हा नोंद

विनाअनुमती क्रिकेट स्पर्धा घेणे आणि त्यात चिअर गर्ल्स आणून नाचवणे यातून समाजाची नितीमत्ता किती ढासळली आहे हेच लक्षात येते. याचप्रकारे कोरोनाचे संकट अल्प झालेले नसतांना गर्दीमुळे कोरोनाचा संसर्गही वाढू शकतो. त्यामुळे असा प्रकार करणार्‍यांना कठोर शिक्षा झाली, तरच पुढील वेळेस अशी अयोग्य कृती करण्यास कुणी धजावणार नाही !

आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍या काश्मीरमधील काँग्रेसच्या नेत्याला अटक

जम्मू-कश्मीर पोलिसांनी शोपिया जिल्ह्यात आतंकवाद्यांना पळून जाण्यास साहाय्य केल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते अधिवक्ता गौहर अहमद वानी यांना अटक केली आहे.

गांधी कुटुंबाने आता काँग्रेस सोडावी ! – ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा

रामचंद्र गुहा हे साम्यवादी विचारसरणीचे इतिहासकार म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांनी गांधी कुटुंबाविषयी केेलेल्या विधानाला नक्कीच महत्त्व आहे !

‘उस्मानिया मशीद मरकज तबलिगी’ हे अनधिकृत धार्मिक स्थळ त्वरित बंद करण्याची एकतानगर, म्हापसा येथील निवासी संकुलातील नागरिकांची शासनाकडे मागणी !

हे प्रशासनाला लज्जास्पद ! मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून त्वरित पुढील कार्यवाहीचा आदेश द्यावा, ही अपेक्षा !

पाकच्या गोळीबाराला भारतीय सैन्याने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकचे ५ सैनिक ठार

पाकला कायमचे नष्ट केल्यावरच भारताला शांतता लाभेल !

‘सनातन पंचांग’ अ‍ॅप हे अत्युत्तम अ‍ॅप  ! – कन्नड अभिनेते जग्गेश

अभिनेते जग्गेश यांनी ट्वीटमध्ये म्हटले, ‘‘आपली संस्कृती, देवता, गुरु, आचार्य, सनातन धर्म, नक्षत्र, सणवार यांविषयी अत्युत्तम माहिती या अ‍ॅपमध्ये मिळते. याच्या साहाय्याने पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणाने आपले शुद्ध आचरण विसरलेल्यांना अभिमानाने आपलेपणाची जाणीव होते.’’

फ्रान्सने बनवला इस्लामी कट्टरतावादाला रोखणारा मसुदा !

लवकरच कायद्यात रूपांतर करणार ! फ्रान्सचे करू शकतो, ते गेली ३ दशके जिहादी आतंकवाद आणि कट्टरतावाद यांमुळे पीडित असलेला भारत का करू शकत नाही ?