कच्चुरू-उडुपी (कर्नाटक) येथील श्री नागेश्‍वर भजनी मंडळात प्रथमोपचाराविषयी ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन

हिंदु जनजागृती समितीचा उपक्रम

बेंगळुरू (कर्नाटक) – कच्चुरू-उडुपी येथील श्री नागेश्‍वर भजनी मंडळाच्या सदस्यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतीच ‘प्रथमोपचार’विषयी ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी समितीचे कार्य आणि उद्देश यांविषयी श्री. विजयकुमार यांनी, तर सध्याच्या काळानुरूप करावयाची साधना आणि कोणता नामजप करायचा, याविषयीची माहिती डॉ. श्रीकला जोशी यांनी उपस्थितांना अवगत करून दिली, तसेच प्रथमोपचाराविषयीची माहिती संध्या राजेश आणि कु. वैष्णवी यांनी सांगितली.  या मार्गदर्शनाचा लाभ भजनी मंडळाच्या अनेक सदस्यांनी घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. श्रीनिधी यांनी केले.

विशेष

हा कार्यक्रम उपस्थित सर्वांना पुष्कळ आवडला. त्यांनी ‘आठवड्यातून एकदा आमच्यासाठी प्रथमोपचार वर्ग घ्या. प्रथमोपचार आम्ही शिकण्याची आवश्यकता आहे’, असे सांगितले. हा कार्यक्रम अत्युत्तम असल्याचा अभिप्रायही त्यांनी व्यक्त केला.