हिंदु जनजागृती समितीचा गोव्यातील हिंदुत्वनिष्ठ उद्योजकांसाठी ऑनलाईन परिसंवाद

‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर विचारमंथन

फोंडा – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच गोवा राज्यातील हिंदुत्वनिष्ठ उद्योजकांसाठी ऑनलाईन परिसंवादाचेे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी उद्योजकांना ‘धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर माहिती सांगितली. या वेळी ते म्हणाले, ‘‘हलाल प्रमाणपत्र देण्याच्या नावाखाली आज समांतर अर्थव्यवस्था उभारली जात आहे आणि त्याचा आतंकवादी कारवायांसाठी उपयोग केला जात आहे. यामुळे हिंदु राष्ट्राच्या उभारणीसाठी आपण प्रत्येक जण काय योगदान देऊ शकतो, याचा अवश्य विचार करावा.’’ यानंतर उद्योजकांनी या विषयावरील आपली मते मांडली. येथील प्रसिद्ध उद्योजक श्री. अनिल खंवटे यांच्यासह ३० उद्योजकांनी या परिसंवादाचा लाभ घेतला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. गोविंद चोडणकर यांनी हिंदु जनजागृती समितीच्या आतापर्यंतच्या कार्याचा आढावा सांगितला. सौ. वेदिका पालन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि शेवटी सर्वांचे आभार मानले.

परिसंवादाला उपस्थित उद्योजकांचे अभिप्राय

  • ‘परिसंवाद अतिशय माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी होता. यापुढेही अशा स्वरूपाच्या परिसंवादात सहभाग घेईन !’ – श्री. गोपाळ फडके, मये, डिचोली
  • ‘परिसंवादात महत्त्वाची आणि अभ्यासपूर्ण माहिती मिळाली.’ – सौ. मनीषा कारेकर, डिचोली.
  • ‘परिसंवादात विषय प्रभावीपणे मांडला. मला असे परिसंवाद किंवा सत्संग यांची आवश्यकता होती. आजपर्यंत कुठल्याही हिंदु संघटनेने असा प्रभावीपणे विषय मांडलेला मी ऐकला नाही. प्रत्येक आठवड्याला असे परिसंवाद किंवा सत्संग ऐकायला मला आवडेल.’ – श्री. अनिश चॅरोडन, पणजी
  • ‘हिंदु जनजागृती समितीने मंदिरांमध्ये धर्मशिक्षण वर्ग चालू करण्यास प्राधान्याने प्रयत्न केले पाहिजेत !’ – श्री. पुरुषोत्तम शिरोडकर, उद्योजक, हणजूण