हिंदु जनजागृती समितीच्या वतीने झारखंड, बंगाल आणि आसाम राज्यांमध्ये प्रबोधन अन् प्रशासनाला निवेदन

येथील बीएस्एस् महिला उच्च विद्यालयामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या कु. कनक भारद्वाज यांनी प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ या विषयावर प्रबोधन केले.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील यांच्यावर खंडणी घेतल्याचा आरोप

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र आणि नगरसेवक नील सोमय्या यांच्यावर वास्तूविशारदाकडून (‘बिल्डर’कडून) खंडणी उकळल्याचा आरोप आहे. अद्याप या प्रकरणी त्यांच्यावर कोणताही गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही.

तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग चालू करावेत ! – पू. भिडेगुरुजी

मराठी तरुणांनी हा आदर्श जोपासत नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग चालू करावा, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले.

उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये प्रशासनाला निवेदन देणे, विद्यार्थ्यांचे प्रबोधन आणि ध्वजसंकलन अभियान

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने २६ जानेवारीच्या निमित्त ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ ही चळवळ अनेक वर्षांपासून राबवण्यात येत आहे. या अंतर्गत उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी शनिशिंगणापुरच्या मंदिरात केली ग्रहशांती

अंधश्रद्धाविरोधी कायदा होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसही प्रयत्न करत होती. त्यांच्या मंत्र्याने केलेली ग्रहशांती पक्षाला चालते का ?

मध्यप्रदेशातील सर्व सरकारी कार्यालयांच्या स्वच्छतेसाठी गोमूत्रापासून बनवलेल्या गो-फिनाईलचा वापर करण्यात येणार !

काँग्रेसने देशात सत्तेत असतांना सर्वच क्षेत्रात इतकी अस्वच्छता निर्माण करून ठेवली आहे ती स्वच्छ करायला गो-फिनाईलच उपयोगी पडणार आहे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटेल !

महापालिका क्षेत्रातील पोलिओ लसीकरण मोहिमेचा सांगलीच्या महापौरांच्या हस्ते शुभारंभ

महापालिकेच्या साखर कारखाना आरोग्य केंद्रात सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या महापौर सौ. गीताताई सुतार यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला.

अवैध व्यवसायांविरोधात धडक कारवाईत पुण्यात ६३ गुन्हेगारांना अटक

येथील विविध अवैध व्यवसायांसमवेत सराईत गुन्हेगारांविरुद्ध २८ जानेवारी या दिवशी संपूर्ण शहरात धाडसत्र राबवत जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार ६३ जणांना अटक केली असून २ लक्ष रुपयांच्या साहित्यासह रोख रक्कम जप्त केली आहे.

डोंबिवलीत वृद्ध पतीने केली पत्नीची हत्या

४ वर्षीय वृद्धाने घरगुती किरकोळ वादातून आपल्या ८० वर्षीय पत्नीची धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या केल्याची घटना येथे घडली आहे.

रेतीमाफियाच्या अटकेसाठी अधिकारी आणि कर्मचारी यांचे काम बंद आंदोलन

रेतीमाफियांची कामे रात्री-अपरात्री चालतात आणि त्यांच्यावर कारवाई करणारे अधिकारी अन् कर्मचारी यांना कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेविना जीव धोक्यात घालून कार्य करावे लागते. ‘अशा गुंडांवर ‘मकोका’ लावण्यात यावा’, अशीही मागणी होत आहे.