भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील यांच्यावर खंडणी घेतल्याचा आरोप

४ घंटे चौकशी

भाजपचे नेते किरीट सोमय्या (उजवीकडे) आणि समवेत त्यांचे पुत्र अन् नगरसेवक नील सोमय्या

मुंबई – भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र आणि नगरसेवक नील सोमय्या यांची ३१ जानेवारी या दिवशी मुलुंड पोलीस ठाण्यात पोलिसांनी खंडणीच्या एका जुन्या प्रकरणात ४ घंटे चौकशी करून त्यांचा जबाब नोंदवून घेतला. हे जुने प्रकरण असून या प्रकरणी नील यांची नव्याने चौकशी चालू करण्यात आली. नील यांच्यावर वास्तूविशारदाकडून (‘बिल्डर’कडून) खंडणी उकळल्याचा आरोप आहे. अद्याप या प्रकरणी त्यांच्यावर कोणताही गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. याविषयी नील आणि त्यांचे वडील किरीट सोमय्या यांनीही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.