महापालिका क्षेत्रातील पोलिओ लसीकरण मोहिमेचा सांगलीच्या महापौरांच्या हस्ते शुभारंभ

पोलिओ लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करतांना (१) महापौर सौ. गीता सुतार

सांगली, ३१ जानेवारी (वार्ता.) – महापालिकेच्या साखर कारखाना आरोग्य केंद्रात सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या महापौर सौ. गीताताई सुतार यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने ४९६ बूथचे नियोजन केले आहे. घरभेटीसाठी २१५ पथके नियुक्त करण्यात आली आहेत. महापालिका क्षेत्रात ० ते ५ वयोगटातील लाभार्थी संख्या ४८ सहस्र ५७५ आहे. या प्रसंगी गटनेते विनायक सिंहासने, नगरसेविका शुभांगी साळुंखे, कांचन कांबळे, नगरसेवक संजय कुलकर्णी, वैद्यकीय आरोग्यधिकारी डॉ. सुनील आंबोळे, तसेच अन्य उपस्थित होते.