तेलंगाणा पोलिसांनी उघड केले देशभरात चालणारे वेश्याव्यवसायाचे मोठे जाळे !

जर हे जाळे देशभरात चालू होते, तर अन्य राज्यांतील पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा यांना ही माहिती का मिळाली नाही ?

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे ‘अय्यप्पा माळ’ परिधान करणार्‍या विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश नाकारला !

अय्यप्पा स्वामींच्या नावाने चालणार्‍या शाळेत मुलांना अय्यप्पा माळ परिधान करण्यास मज्जाव केला जात असेल, तर ते संतापजनक होय !

अभिनेता विजय देवरकोंडा याची ‘ईडी’कडून चौकशी

‘त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘लायगर’ चित्रपट बनवण्यासाठी पैसे कुठून आले ?’, याविषयी ही चौकशी करण्यात आली. काही राजकारण्यांनीही चित्रपटात पैसे गुंतवल्याचा आणि या चित्रपटाद्वारे काळा पैसा सहज पांढरा करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे भाजपच्या खासदाराच्या घराची तोडफोड

तेलंगाणामध्ये सत्ताधारी भारत राष्ट्र समिती पक्षाची ही हुकूमशाहीच आहे ! या घटनेतील दोषींच्या विरोधात सरकार काही करणार नसल्याने केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे !

बेंगळुरूनंतर आता भाग्यनगरमध्येही भारतद्वेष्टा कलाकार वीर दास याचा कार्यक्रम रहित !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या संघटित विरोधाचा परिणाम ! हिंदु जनजागृती समितीसमवेत अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या संघटित विरोधामुळे हा कार्यक्रम रहित करण्यात आला, अशी माहिती स्थानिक इंग्रजी वृत्तपत्र ‘द हंस इंडिया’ने दिली.

तेलंगाणातील आमदार खरेदी प्रकरणी ३ जणांना अटक  

तेलंगाणातील सत्ताधारी पक्ष भारत राष्ट्र समितीच्या ४ आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न झाल्याच्या प्रकरणी सरकारने विशेष अन्वेषण पथक स्थापन केले आहे. या पथकाने या प्रकरणी तेलंगाणासह केरळ, कर्नाटक आणि हरियाणा  राज्यांतील ७ ठिकाणी या धाडी घातल्या गेल्या.

महंमद पैगंबर यांच्या कथित अवमानच्या प्रकरणी हिंदु विद्यार्थ्याला नग्न करून अमानुष मारहाण !

भाग्यनगर येथील घटना
मारहाण करणार्‍या मुसलमान विद्यार्थ्यांनी हिंदु विद्यार्थ्याला ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देण्यास भाग पाडले !

राजा सिंह ठाकूर यांना जामीन संमत

ऑगस्ट मासात राजा सिंह यांच्यावर एका ‘यूट्यूब व्हिडिओ’मध्ये महंमद पैंगबर यांच्याविषयी कथित टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला होता.

सहस्रार्जुन महाराजांच्या आशीर्वादाने भारताला परत हिंदु राष्ट्र बनवण्याचा संकल्प करूया ! – चेतन गाडी, हिंदु जनजागृती समिती

आपण सर्व या महापुरुषाचे वंशज आहोत. आपणही आपल्यात क्षात्रतेज निर्माण करून हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांच्या विरोधात वैध मार्गाने लढा देऊया.

तेलंगाणामध्ये अश्‍लील गाण्यात हिंदूंच्या मंत्रजपाचा वापर केल्यावरून गायकाच्या विरोधात गुन्हा नोंद !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा विरोधाच परिणाम !
तेलुगु यू ट्यूब चॅनलने गाणे हटवले !