तेलंगाणामध्ये अश्‍लील गाण्यात हिंदूंच्या मंत्रजपाचा वापर केल्यावरून गायकाच्या विरोधात गुन्हा नोंद !

  • हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा विरोधाच परिणाम !

  • तेलुगु यू ट्यूब चॅनलने गाणे हटवले !

सायबर पोलिसांना निवेदन दिल्यानंतर पोलीस ठाण्याबाहेर निवेदन दाखवतांना हिंदुत्वनिष्ठ

भाग्यनगर (तेलंगाणा) – प्रसिद्ध चित्रपट संगीतकार आणि गायक देवी श्री प्रसाद यांचे ‘ओ परी’ या अश्‍लील गाण्यामध्ये ‘हरे रामा हरे कृष्णा’ हा मंत्रजप जोडण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी येथील सायबर पोलिसांकडे तक्रार केली. देवी श्री प्रसाद यांच्याविरुद्ध कलम १५३(अ) आणि २९५(अ) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. (हिंदूंच्या मंत्रजपाचे विडंबन रोखण्यासाठी तत्परतेने कृती करणार्‍या हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे अभिनंदन ! – संपादक)

हे गाणे रकीब आलम याने लिहिले असून ‘टी सीरिज’ या आस्थापनाने ते प्रकाशित केले आहे. या गाण्याचे निर्माते आणि अन्य संबंधित लोकांवरही गुन्हा नोंदवण्याची मागणीही तक्रारीत करण्यात आली आहे. गुन्हा नोंदवल्यानंतर तेलुगु यू ट्यूब चॅनल ‘टोनिक’वरून हे गाणे हटवण्यात आले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना हिंदुत्वनिष्ठ

देवी श्री प्रसाद यांना शिक्षा होईपर्यंत संघर्ष चालू राहील ! – हिंदु जनजागृती समिती

‘टी सीरिजकडून सदर गाणे हटवले जाईपर्यंत आणि देवी श्री प्रसाद यांना शिक्षा होईपर्यंत आमचा संघर्ष चालू राहील’, असा निर्धार हिंदु जनजागृती समितीचे तेलंगाणा आणि आंधप्रदेश राज्य समन्वयक श्री. चेतन गाडी यांनी व्यक्त केला.