अभिनेता विजय देवरकोंडा याची ‘ईडी’कडून चौकशी

अभिनेता विजय देवरकोंडा

भाग्यनगर (तेलंगाणा) – प्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा याची अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) ३० नोव्हेंबर या दिवशी ९ घंटे चौकशी केली. ‘त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘लायगर’ चित्रपट बनवण्यासाठी पैसे कुठून आले ?’, याविषयी ही चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर देवरकोंडा म्हणाला, ‘लोकप्रियता मिळवण्याचे काही दुष्परिणाम आणि समस्याही असतात. जेव्हा मला ईडीनेे चौकशीसाठी बोलावले, तेव्हा मी माझे कर्तव्य पार पाडले.’

१. यापूर्वी १७ नोव्हेंबर या दिवशी चित्रपटाची निर्माती चार्मी कौर आणि दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांचीही परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे (फेमा) उल्लंघन केल्याच्या प्रकरणी चौकशी करण्यात आली होती.

२. काँग्रेसच्या नेत्या बक्का जुडसन यांनी या चित्रपटाच्या संदर्भात तक्रार केली आहे. काही राजकारण्यांनीही चित्रपटात पैसे गुंतवल्याचा आणि या चित्रपटाद्वारे काळा पैसा सहज पांढरा करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.