महंमद पैगंबर यांच्या कथित अवमानच्या प्रकरणी हिंदु विद्यार्थ्याला नग्न करून अमानुष मारहाण !

  • भाग्यनगर येथील घटना

  • मारहाण करणार्‍या मुसलमान विद्यार्थ्यांनी हिंदु विद्यार्थ्याला ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देण्यास भाग पाडले !

(‘अल्लाहू अकबर’, म्हणजे अल्ला महान आहे)

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील ‘इक्फाय फाऊंडेशन फॉर हायर एज्युकेशन’ या महाविद्यालयात हिमांक बंसल नावाच्या एका हिंदु विद्यार्थ्याने महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्याच्या प्रकरणी त्याचा शारीरिक आणि लैंगिक छळ करण्यात आला. मारहाण करणारे याच महाविद्यालयातील धर्मांध मुसलमान विद्यार्थी असून त्यांनी हिमांक याला नग्न करून अश्‍लाघ्य शिवीगाळ करत मारहाण केली, तसेच त्याला ‘अल्लाहू अकबर’ अशा घोषणा देण्यास भाग पाडले. ही घटना १ नोव्हेंबरची असून पीडित विद्यार्थ्याने ११ नोव्हेंबरला पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

१. कायद्याचे प्रथम वर्षाचे शिक्षण घेणार्‍या १९ वर्षीय हिमांकने तक्रारीत म्हटले आहे की, संबंधित विद्यार्थ्यांनी त्याला धक्काबुक्की करत चुकीची वागणूक दिली. यासह त्याच्या चेहर्‍यावर, गालावर, पोटात लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. एवढेच नव्हे, तर त्याला नग्न करून त्याच्या गुप्तांगाला स्पर्श करत त्याला काही रसायने आणि पावडर बळजोरीने खाऊ घातली. एका विद्यार्थ्याने हिमांकच्या तोंडात त्याचे गुप्तांग घालण्याचा किळसवाणा प्रयत्नही केला, असा आरोपही हिमांकने केला आहे.

२. या घटनेचे संतापजनक व्हिडिओ आणि छायाचित्रे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये प्रसारित झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

काय आहे प्रकरण ?

‘नवभारत टाइम्स’ या हिंदी वृत्तसंकेतळानुसार हिमांक बंसल याची त्याच्या वर्गातील एका विद्यार्थिनीशी मैत्री होती. दोघे भ्रमणभाषवर संभाषण (चॅट) करत असतांना हिमांकने महंमद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केली, असा त्याच्यावर आरोप आहे. संबंधित विद्यार्थिनीने हे वक्तव्य सर्वत्र प्रसारित केले. यावरून १५-२० मुसलमान विद्यार्थ्यांनी हिमांकला मारहाण केली.

संपादकीय भूमिका

  • ‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हणणारे या घटनेविषयी काही बोलतील का ?
  • अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उदोउदो करणारी टोळी आता कुठल्या बिळात जाऊन लपली आहे ?