सनातन संस्‍था आध्‍यात्मिक क्षेत्रात अद़्‍भुत कार्य करत आहे ! – प्रमुख आध्‍यात्मिक वेत्ता आर्ष विद्या तपस्‍वी श्री बंगरय्‍या शर्मा

‘तेलुगु सनातन पंचांग २०२३’च्‍या ‘अँड्रॉईड’ आणि ‘आय.ओ.एस्.’ यांच्‍या ‘अ‍ॅप’चे लोकार्पण श्री बंगरय्‍या शर्मा यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्यांनी असे गौरवोद्गार काढले.

‘हैद्राबाद बुक फेअर’मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

सनातन संस्थेच्या प्रदर्शनाचे एका ‘यु ट्यूब’ वाहिनीच्या प्रतिनिधीने चित्रीकरण करून त्याचे प्रसारण केले. त्यात अधिकाधिक लोकांनी संस्थेच्या प्रदर्शनाला भेट देण्याविषयी आवाहन करण्यात आले.

भगवान अय्यप्पा स्वामी यांचा अवमान करणारे नास्तिकतावादी बैरी नरेश यांच्या विरोधात भाग्यनगरमध्ये हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे आंदोलन !

हिंदूंनो, देवतांचा वारंवार अवमान होऊ नये, यासाठी हिंदु राष्ट्राची आग्रही मागणी करा !

तेलंगाणा येथे भगवान अय्यप्पाविषयी अश्‍लाघ्य वक्तव्ये करणार्‍या नास्तिकतावादी नेत्याला भक्तांकडून चोप !  

हल्ली कुणीही उठतो आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या देवतांवर टीका करतो. हे थांबवायचे असेल, तर कठोर प्रावधान असलेला ईशनिंदाविरोधी कायदा अस्तित्वात आणणे आवश्यक !

पी.एफ्.आय. कराटे शिकवण्याच्या नावाखाली आतंकवादी प्रशिक्षण केंद्र चालवत होती !

एखाद्या संघटनेवर बंदी घालून ती संघटना संपत नाही, तर तिला मुळासकट, तिच्या विचारांसकट नष्ट करण्याची आवश्यकता असते आणि त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक असते, हेच यातून लक्षात येते !

भारतीय संस्कृतीत नसल्याने १ जानेवारीला नवीन वर्ष साजरे करू नका !

प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांचे आवाहन !

(म्हणे) ‘येशू ख्रिस्ताचा आशीर्वाद आणि दया यांमुळे आपण कोरोनाला पराजित करू शकलो !’

तेलंगाणा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक जी. श्रीनिवास राव यांचे विधान !

रंगारेड्डी (तेलंगाणा) येथे डॉक्टर तरुणीचे १०० जणांनी घरात घुसून केले अपहरण !

एका डॉक्टर तरुणीचे अशा प्रकारे अपहरण करण्याचे धाडस होतेच कसे ? राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नावाचा प्रकार आहे कि नाही ?

भाग्यनगर (तेलंगाणा) येथील ‘हलाल जिहाद’ ग्रंथाच्या तेलुगू आवृत्तीच्या प्रकाशनाचा कार्यक्रम अनुमती नाकारल्याने रहित !

ग्रंथ प्रकाशनाला भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त अधिकारी अतिथी म्हणून उपस्थित राहणार असतांनाही कार्यक्रम दबाव आणून रहित करण्यास भाग पाडणे, ही लोकशाहीतील दडपशाही आहे !