ईडीकडून भागीदार सुजित पाटकर यांच्‍यासह एका आधुनिक वैद्याला अटक !

कोविड केंद्र गैरव्‍यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने लाईफ लाईन मॅनेजमेंट आस्‍थापनाचे भागीदार सुजित पाटकर यांच्‍यासह एका आधुनिक वैद्य किशोर बिसुरे यांना अटक केली.

‘जय श्रीराम’ लिहिलेली भगवी पट्टी घालून येणार्‍या विद्यार्थ्‍यास महाविद्यालयाकडून दमदाटी !

गळ्‍यात भगवी पट्टी घालणार्‍यांना महाविद्यालय प्रशासन दमदाटी करत असेल, तर अशा प्रशासनाला पालकांनीही वैध मार्गाने जाब विचारणे आवश्‍यक !

परदेशी शिक्षणासाठीच्‍या शिष्‍यवृत्तीच्‍या विद्यार्थी संख्‍येतील वाढीचा निर्णय घेऊ ! – शंभूराज देसाई, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क मंत्री

विधानपरिषदेमध्‍ये काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांनी अनुसूचित जाती-जमातीच्‍या विद्यार्थ्‍यांना परदेशी शिक्षण शिष्‍यवृत्ती संदर्भात विचारलेल्‍या प्रश्‍नाला उत्तर देतांना ते बोलत होते.

शासकीय पशू-मत्‍स्‍यव्‍यवसाय विज्ञान विद्यापिठाच्‍या कार्यकारिणीत गोसेवा आयोगाच्‍या प्रतिनिधीची नियुक्‍ती होणार !

२० जुलै या दिवशी महाराष्‍ट्र पशू आणि मत्‍स्‍यव्‍यवसाय विज्ञान विद्यापीठ अधिनियमामध्‍ये सुधारणा करून शासनाने ही नियुक्‍ती घोषित केली.

कोपरगावात अवैध कार्य करणार्‍या मदरशावर बुलडोजर चालवावा लागेल ! – सुरेश चव्‍हाणके, संपादक, सुदर्शन वाहिनी

लव्‍ह जिहाद आणि धर्मांतर यांच्‍या विरोधात कोपरगाव (अहिल्‍यानगर) येथे जनआक्रोश मोर्चा

दोषी अधिकार्‍यांवर कठोरातील कठोर कारवाई करा ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीने मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या संभाजीनगर खंडपिठामध्‍ये सरकारीकरण झालेल्‍या तुळजापूर देवस्‍थानातील घोटाळ्‍यांच्‍या संदर्भात, तसेच देवीचे अलंकार गहाळ झाल्‍याविषयी याचिका प्रविष्‍ट केली होती.

श्री भवानीदेवीच्‍या अलंकारांची पडताळणी करण्‍याचे जिल्‍हाधिकार्‍यांचे आदेश !

श्री तुळजाभवानीदेवीच्‍या अलंकारांमध्‍येच अपहार होत असेल, तर मंदिराच्‍या कारभारात किती गलथानपणा असेल ?’, याचा अंदाज यावरून येतो. त्‍यामुळे मंदिरे ही सरकारीकरणातून मुक्‍त करून भक्‍तांच्‍याच कह्यात द्यायला हवीत !

कोल्‍हापूर येथील हिंदूंना जामीन !

कोल्‍हापूर येथे जागृत झालेल्‍या हिंदूंचा आदर्श सर्वत्रच्‍या हिंदूंनी घेतल्‍यास हिंदु राष्‍ट्र दूर नाही !

खालापूर (रायगड) येथे इरशाळवाडी गावात दरड कोसळून १२ जणांचा मृत्यू !

मोरबे धरणाच्या परिसरात वरील बाजूस इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इरशाळवाडी या गावात रात्री ११.३० ते १२ वाजण्याच्या दरम्यान डोंगरावरून भली मोठी दरड खाली कोसळली. या दुर्घटनेत ३० ते ४० घरे नागरिकांसह गाडली गेली.

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यातील दुर्घटनेच्या चौकशीच्या विलंबावरून विरोधक आक्रमक !

‘‘कार्यक्रमाच्या ठिकाणी व्यवस्था उत्तम प्रकारे ठेवण्यात आली होती. उष्णतामान वाढल्याने हा प्रकार घडला. ‘विरोधीपक्ष यामध्ये अतिशय घाणेरडे आणि क्षुद्र राजकारण करत आहेत.’’ – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार