कोल्‍हापूर येथील हिंदूंना जामीन !

औरंगजेबाच्‍या स्‍टेटसमुळे हिंदूंचा उद्रेक झाल्‍याचे प्रकरण !

कोल्‍हापूर – करवीर तालुक्‍यातील मौजे वरणगे पाडळी या गावात एका धर्मांधाने भ्रमणभाषवर वादग्रस्‍त ‘स्‍टेटस’ ठेवले होते. या प्रकरणी ७ जूनला गावातील सर्वांनी एकत्र येऊन निषेध केला होता. रात्री या गावात वाद निर्माण होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्‍यातून गावातील प्रार्थनास्‍थळाच्‍या जाळपोळीची घटना घडली होती. या प्रकरणी ३० ते ४० जणांवर गुन्‍हा नोंद झाला होता. यातील अभिजित कदम, प्रथमेश व्‍हनारे, पृथ्‍वीराज पाटील, अविनाश बुचडे, अवधूत पाटील, गणेश बुचडे, नीलेश पाटील या सर्वांना पोलिसांनी ७ जुलैला अटक करून प्रथमवर्ग न्‍यायदंडाधिकारी यांच्‍यासमोर उपस्‍थित केले. या सर्वांना न्‍यायालयीन कोठडीत ठेवण्‍याचे आदेश दिले.

सदर आदेशाच्‍या विरोधात अधिवक्‍ता प्रदीप माकणे (यळगूडकर) यांनी जिल्‍हा आणि सत्र न्‍यायालयात जामिनासाठी आवेदन सादर केले. या प्रकरणी अधिवक्‍ता प्रदीप माकणे यांनी जोरदार युक्‍तीवाद करून केवळ २ दिवसांत संशयितांना जामीन मिळवून दिला. या कामात त्‍यांना अधिवक्‍ता डी.एम्. लटके यांचे मार्गदर्शन लाभले, तर  अधिवक्‍ता प्रदीप पुजारी, अधिवक्‍ता सुषमा पवार, अधिवक्‍ता प्रियांका जवळगेकर यांचे सहकार्य लाभले.

कोल्‍हापूर येथे जागृत झालेल्‍या हिंदूंचा आदर्श सर्वत्रच्‍या हिंदूंनी घेतल्‍यास हिंदु राष्‍ट्र दूर नाही !

या संदर्भात अधिवक्‍ता प्रदीप माकणे म्‍हणाले, ‘‘सामाजिक माध्‍यम, तसेच अन्‍य प्रकरणात विद्यार्थी अन् युवक यांना खोट्या गुन्‍ह्यात गोवल्‍यास निष्‍पाप लोकांची बाजू न्‍यायालयात मांडून खोटा गुन्‍हा नोंद करणार्‍या अधिकार्‍यांच्‍या विरोधात कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल.’’