दरड प्रवण गावांवर लक्ष द्या ! – रत्नागिरी जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

दरड प्रवण गावांवर विशेषत: डोंगराच्या पायथ्याशी असणार्‍या गावांवर सर्व यंत्रणांनी समन्वयाने लक्ष द्या. ग्रामस्थांशी बोलून त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करा, अशा सूचना जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी दिल्या.

राज्यशासन ‘शिक्षणाचा हक्क’ कायद्यामध्ये सुधारणा करणार ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

राज्यात शिक्षणाचा हक्क कायद्यामध्ये कर्नाटकच्या पार्श्वभूमीवर सुधारणा करण्यात येणार आहे. शासन नवीन संकल्पेवर दर्जेदार शिक्षण  मिळतील, अशा शाळांची निर्मिती करणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी तारांकित प्रश्नावर उत्तर देतांना २१ जुलै या दिवशी विधानसभेत दिली.

३१ जुलैपर्यंत रघुवीर घाट बंद रहाणार ! – खेड उपविभागीय अधिकारी राजश्री मोरे

पावसाळ्यामध्ये दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने सदर मार्ग जाण्या-येण्यासाठी धोकादायक होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये दरड कोसळून मानवी जीवितास धोका उद्भवण्याची शक्यता असल्याने सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून खोपी-शिरगाव येथील रघुवीर घाट ३१ जुलैपर्यंत पर्यटकांकरता बंद करण्यात येत आहे, असा आदेश खेड उपविभागीय अधिकारी राजश्री मोरे यांनी दिला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

जिल्ह्यात गेल्या २ दिवसांपासून पुष्कळ मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून पूरसदृश स्थितीमुळे अनेक ठिकाणी भातशेती पाण्याखाली गेली आहे. वादळी वार्‍यासह पडणार्‍या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहे.

महावितरणकडून अंदाजे वीजदेयके देऊन शेतकर्‍यांची लूट !

माण तालुक्‍यात पावसाअभावी दुष्‍काळ आहे. जनावरे जगवायची की स्‍वत: जगायचे अशी भिषण स्‍थिती असूनही शेतावर मोटार चालवली; म्‍हणून महावितरणकडून शेतकर्‍यांना अंदाजे वीजदेयके देऊन त्‍यांची लूट होत आहे.

छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी हडपणारा ‘वक्‍फ कायदा’ रहित करा !

छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी हडपणारा वफ्‍क कायदा रहित करण्‍यात यावा, या मागणीसाठी १७ जुलै या दिवशी परभणी येथील उपजिल्‍हाधिकारी श्रीमती स्‍वाती दाभाडे आणि नांदेड येथील अप्‍पर जिल्‍हाधिकारी पी.एस्. बोरगावकर यांना निवेदन देण्‍यात आले.

राज्‍यभर पाऊस चालूच !

राज्‍यात पश्‍चिम महाराष्‍ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्‍ट्र आणि मराठवाडा आदी सर्वच ठिकाणी २ दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. राज्‍यात सर्वच ठिकाणच्‍या नदी-नाल्‍यांना पूर आला असून त्‍यांच्‍या आसपासचे अनेक मार्ग बंद पडल्‍याने अनेक खेडेगावांचा संपर्क तुटला आहे.

पंचगंगा नदीचे पाणी पात्राच्‍या बाहेर !

कोल्‍हापूर जिल्‍ह्यात चालू असलेल्‍या संततधार पावसाने कोल्‍हापूर शहरात १९ जुलैला पंचगंगा नदी रात्री ११.१५ वाजता नदीच्‍या पात्राच्‍या बाहेर पडली. सध्‍या नदीच्‍या पाण्‍याची पातळी ३२ फूट असून केवळ एका दिवसात १० फूट पाणी वाढले आहे.

गुरुदेव डॉ. काटेस्‍वामीजींचे कार्य अतुलनीय ! – ह.भ.प. लक्ष्मीकांतजी महाराज पाथरीकर

परमपूज्‍य गुरुदेव डॉ. काटेस्‍वामीजी यांनी सनातन वैदिक हिंदु धर्मासाठी केलेले कार्य हे अतुलनीय असून त्‍यांनी लिहिलेले वाड्‌मय हे धर्मरक्षण आणि धर्म संवर्धनासाठी मैलाचा दगड ठरेल, असे प्रतिपादन भागवतोत्तम ह.भ.प. लक्ष्मीकांतजी महाराज पाथरीकर यांनी केले.

खापरखेडा औष्‍णिक वीज केंद्र (नागपूर) येथील राखेचा बंधारा फुटल्‍याने शेतात चिखल !

बंधार्‍यातून बाहेर निघालेली राख आणि चिखल अनेक शेतकर्‍यांच्‍या शेतात पसरला आहे. त्‍यामुळे नुकतीच पेरणी केलेल्‍या शेतकर्‍यांचीही पुष्‍कळ आर्थिक हानी झाली आहे.