कोविड केंद्रात झालेल्या गैरव्यवहाराचे प्रकरण
मुंबई – कोविड केंद्र गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने लाईफ लाईन मॅनेजमेंट आस्थापनाचे भागीदार सुजित पाटकर यांच्यासह एका आधुनिक वैद्य किशोर बिसुरे यांना अटक केली. गुन्ह्यातील रक्कम व्यवहारात आणण्यात आल्याप्रकरणी त्यांचा सहभाग उघड झाला आहे. अटक करण्यात आलेले आधुनिक वैद्य बिसुरे हे कोविड केंद्राचे प्रभारी होते, तर पाटकर मध्यस्थ म्हणून काम करत होते. बिसुरे यांनी आधुनिक वैद्यांची बनावट सूची बनवली. ३८ कोटी रुपयांना हा गैरव्यवहार करण्यात आला होता.
BMC Covid Scam | सुजीत पाटकर, डॉ. किशोर बिसुरे यांना ईडीकडून अटकhttps://t.co/ZAY2w9573y
By दैनिक महाराष्ट्र via Dailyhunt#BMC #Scam #Covid #DainikMaharashtra
— Dainik Maharashtra (@Dainik_mha) July 20, 2023