श्री गणेश जयंतीच्या निमित्ताने व्यंकटेश ग्रूपच्या वतीने रक्तदान शिबिर पार पडले

व्यंकटेश ग्रूपच्या वतीने रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे आणि अन्य

सांगली, १६ फेबुवारी (वार्ता.) – श्री गणेश जयंतीच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक १६ मधील व्यंकटेश ग्रूपच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. याचे उद्घाटन भाजप नगरसेविका अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे आणि भाजप युवा उपाध्यक्ष सुजित राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे या वर्षी श्री गणेश जयंती साध्या पद्धतीने सर्वत्र साजरी करण्यात आली. या वेळी अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे म्हणाल्या, महाराष्ट्रात सध्या रक्ताचा तुटवडा चालू असून रुग्णांच्या शस्त्रकर्मासाठीही रक्त उपलब्ध नाही. त्यासाठी अन्य मंडळांनी याचा आदर्श घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करावे.

या प्रसंगी शाहजी भोसले, उत्तम हरगे, राहुल बाबर, गणेश घाडगे, पंकज उपाध्ये, प्रशांत जाधव यांसह अन्य उपस्थित होते.