
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – येथे मोठ्या उत्साहात आणि मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचा विवाह सोहळा दुपारी १२ वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पार पडला. या सोहळ्यानिमित्त संपूर्ण मंदिर विविध प्रकारच्या ५ टन फुलांनी सजवण्यात आले होते. पुणे येथील भाविक भारत भुजबळ यांनी ही मनमोहक फुलांची सजावट केली होती.
रुक्मिणी स्वयंवर कथा सांगून या उत्सवास प्रारंभ झाला. दुपारी १२ वाजता श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या प्रतिकात्मक मूर्ती सभामंडपात आणण्यात आल्या. त्यानंतर मंत्रोच्चार आणि मंगलाष्टक यांच्या गजरात उपस्थितांनी अक्षता वाहिल्या. या वेळी मंदिरातील वातावरण अधिकच मंगलमय झाले होते.
वारकर्यांना ‘घुसखोर’ म्हणून हिणवणार्यांचा जाहीर निषेध, तर हिंदुत्वनिष्ठ संतांचा भव्य सन्मान करणार ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
पंढरपूरच्या वारीमध्ये दांभिकांचा मुक्त संचार कशासाठी ?
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !