(म्हणे) ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या आयोजकांवर कारवाई करा ! – एस्.डी.पी.आय.

भारताला ‘इस्लामी देश’ बनवण्याच्या जिहाद्यांच्या ध्येयाविषयी ‘ब्र’ही न काढणारे हिंदु राष्ट्राला विरोध करतात, हे लक्षात घ्या !

सभेविषयी अपप्रचार आणि जातीय तेढ निर्माण करणार्‍या एस्.डी.पी.आय. विरुद्ध कायदेशीर कारवाई करा !

मंगळुरू येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेला विरोध केल्याच्या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस उपायुक्तांना निवेदन !

भाजपचे खासदार मुनीस्वामी यांनी पती जिवंत असतांना टिकली न लावणार्‍या महिलेला खडसावले !

हिंदूंना धर्मपालन करण्यास कुणी सांगत असतांना त्याला काँग्रेस आणि अन्य ढोंगी पुरो(अधो)गामी विरोध करतात; मात्र हेच लोक कर्नाटकातील शाळांमध्ये हिजाबवर बंदी आणण्याला विरोध करतात ! यातून त्यांचा ढोंगीपणा उघड होतो !

(म्हणे) ‘उडुपी येथील श्रीकृष्ण मठाला मुसलमान शासकाने भूमी दिली होती !’ – काँग्रेसचे नेते मिथुन राय

धादांत खोटी विधाने करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या अशा नेत्यांना कारागृहात टाका !

(म्हणे) ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभेला अनुमती देऊ नये !’ – सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एस्.डी.पी.आय.)

हिंदु राष्ट्राच्या नावाने होणार्‍या सभेला जिहादी संघटना, पक्ष आणि नेते यांचा जळफळाट होणार, यात शंका नाही; मात्र राज्यघटनेने दिलेल्या स्वातंत्र्यानुसारच ही सभा होत असल्याने कुणी कितीही आदळआपट केली, यावर काहीही परिणाम होणार नाही !

(म्हणे) ‘हिंदु राष्ट्रचा आग्रह धरणे म्हणजे कायदाद्रोह !’ – रियाझ फरंगीपेठ, सोशल डेमोक्रॅटिक ऑफ इंडियाचे नेते

हिंदु राष्ट्राची मागणी करणे, हा राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे. त्याला कायदाद्रोह म्हणणे हाच कायदाद्रोह आहे !

बेळगाव-कोल्‍हापूर प्रत्‍येक अर्ध्‍या घंट्याला विनाथांबा बससेवा !

सध्‍या या मार्गावरील गाड्या बेळगाव, हत्तरगी, संकेश्‍वर, निपाणी येथून कोल्‍हापूरला येत होत्‍या. आता विनाथांबा गाडी उपलब्‍ध झाल्‍याने प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

बेळगाव-धारवाड या मार्गावरील अनारक्षित एक्‍स्‍प्रेसचा प्रारंभ !

बेळगाव-धारवाड या मार्गावरील अनारक्षित एक्‍स्‍प्रेसचा प्रारंभ ६ मार्चपासून खासदार मंगला अंगडी यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. या रेल्‍वेमुळे सायंकाळच्‍या वेळी बेळगावहून धारवाड, तसेच तेथून म्‍हैसूरला जाणे सोयीचे ठरणार आहे. २

‘लोकसेवा फाऊंडेशन’च्‍या पुढाकाराने हिंदु देवतांच्‍या ४ सहस्रांहून अधिक प्रतिमांचे विधीवत् अग्‍निसमर्पण !

शहरातील विविध भागांत, रस्‍त्‍याच्‍या शेजारी, झाडाखाली, मंदिर परिसरात ठेवण्‍यात आलेल्‍या हिंदु देवतांच्‍या ४ सहस्रांहून अधिक प्रतिमा एकत्र करून ‘लोकसेवा फाऊंडेशन’च्‍या पुढाकाराने त्‍यांचे बसव कॉलनी परिसरात विधीवत् अग्‍निसमर्पण करण्‍यात आले.

कर्नाटकमध्‍ये १२ वीच्‍या विद्यार्थिनींना हिजाब घालून परीक्षा देता येणार नाही !

इयत्ता १२ वीच्‍या विद्यार्थिनींना हिजाब घालून परीक्षाकेंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. हे स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे की, गणवेश परिधान करूनच परीक्षेसाठी यायचे आहे. हिजाब हा गणवेशाचा भाग नाही, अशी स्‍पष्‍टोक्‍ती कर्नाटकचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.