ShriramMandir Godhra Incident : ‘श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्‍वभूमीवर देशात गोध्रासारखी घटना घडण्याची शक्यता !’ – काँग्रेसचे नेते बी.के. हरिप्रसाद,

कर्नाटकातील काँग्रेसचे नेते बी.के. हरिप्रसाद यांचा फुकाचा दावा !

बेंगळुरू (कर्नाटक) – मी तुम्हाला अशीही माहिती देऊ शकतो की, काही संघटनांचे प्रमुख काही राज्यांमध्ये गेले होते आणि त्यांनी तेथील काही भाजपच्या नेत्यांना भडकावले. मी हे उघडपणे सांगू शकत नाही; परंतु ते हे करत आहेत. ते असे अपघातांचे कट रचत आहेत. त्यामुळे गोध्रा घटनेसारखी घटना घडण्याची दाट शक्यता आहे, अशी भीती कर्नाटकातील काँग्रेसचे नेते बी.के. हरिप्रसाद यांनी व्यक्त केली आहे.

वर्ष २००२ मध्ये गोध्रा रेल्वे स्थानकावर साबरमती एक्सप्रेसच्या एका डब्याला बाहेरून कडी लावून धर्मांध मुसलमानांनी आग लावली होती. यात ५४ कारसेवकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गुजरातमध्ये दंगल उसळली होती.

सौजन्य : टाइम्स ऑफ इंडिया 

हरिप्रसाद पुढे म्हणाले की, श्रीराममंदिर अभिषेक सोहळा हा धार्मिक नसून राजकीय कार्यक्रम आहे. माझ्या माहितीनुसार ४ शंकराचार्य हे हिंदु धर्माचे प्रमुख आहेत. ४ शंकराचार्यांनी किंवा कोणत्याही धार्मिक नेत्याने कार्यक्रमाचे उद्घाटन केले असते, तर मीही या कार्यक्रमात सहभागी झालो असतो. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे धार्मिक नेते नसून राजकारणी आहेत. हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

संपादकीय भूमिका 

अशा प्रकारचे विधान करून ‘गोध्राची घटना हिंदूंनी घडवली’, असा दावा करून हिंदूंना ‘खुनी’ रंगवण्याचा काँग्रेसवाले अश्‍लाघ्य प्रयत्न करत आहेत, हे लक्षात घ्या !