Hindu Hatred Congress : श्रीरामजन्मभूमीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या ३०० हिंदूंवर कर्नाटकातील काँग्रेस सरकार कारवाई करणार !

श्रीकांत पुजारी नावाच्या व्यक्तीला अटक

हुब्बळ्ळी (कर्नाटक) – अयोध्येत येत्या २२ जानेवारीला भव्य श्रीराममंदिर उभे रहात असतांना कर्नाटकातील काँग्रेस सरकार श्रीरामजन्मभूमी आंदोलनाच्या प्रकरणातील राज्यातील आंदोलकांवर कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहे. येथे ५ डिसेंबर १९९२ मध्ये घडलेल्या एका प्रकरणात पोलिसांनी श्रीकांत पुजारी या व्यक्तीला अटक केली आहे.

कर्नाटक पोलिसांनी एक पथक स्थापन केले आहे. याद्वारे या आंदोलनात सहभागी झालेल्यांची सूची बनवण्यात आली आहे. त्यांच्यावर आता कारवाई करण्यात येत आहे. यात ३०० जणांची नावे असल्याचे म्हटले जात आहे. हे सर्व जण वर्ष १९९२ ते १९९६ या काळात झालेल्या दंगलींमध्ये सहभागी होते, असा पोलिसांचा आरोप आहे.

५ डिसेंबर १९९२ या दिवशी हुब्बळ्ळी येथे धार्मिक दंगल झाली होती. यात एका मुसलमानाच्या दुकानाला आग लावण्यात आली होती. या प्रकरणी ३० वर्षांनंतर श्रीकांत पुजारी यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात ते तिसरे आरोपी आहेत. एकूण ८ जण यात आरोपी आहेत. उर्वरित लोकांचा शोध घेतला जात आहे.

संपादकीय भूमिका

श्रीरामजन्मभूमीतील आंदोलकांवर ३० वर्षांनंतर सूडबुद्धीने कारवाई करणारे काँग्रेसचे सरकार म्हणजे रावणाचेच सरकार आहे, असेच आता कर्नाटकातील हिंदूंना वाटत असणार !