|
मंगळुरू (कर्नाटक) – येथे २९ नोव्हेंबर २०२२ या दिवशी रोजी कर्नाटकातील मंगळुरू येथे रिक्शामध्ये झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. या प्रकरणात इस्लामिक स्टेटचा हात असल्याचे उघड झाले होते. हा स्फोट घडवून आणण्यासाठी जिहादी आतंकवाद्यांनी हिंदूंच्या नावाने बनावट ओळखपत्र बनवल्याचेही समोर आले आहे. या स्फोटात रिक्शाचालक पुरुषोत्तम आणि महंमद शारिक हे घायाळ झाले होते. यात शारिक हा आरोपी आहे. त्याच्या कुटुंबाकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या घरात काँग्रेसचे कार्यालय चालवले जात होते, असेही उघड झाले आहे.
१. महंमद शारिक हा ‘प्रेशर कुकर बाँब’ घेऊन प्रवास करत होता. त्याला कादरी मंजुनाथ मंदिरात बाँबस्फोट करून हिंदूंना घाबरवायचे होते; मात्र वाटेत ‘प्रेशर कुकर बाँब’चा स्फोट झाला. शारिक हा ‘प्रेमराज’ नावाने बनावट आधार कार्ड घेऊन प्रवास करत होता.
२. या घटनेनंतर शारिक याला आतंकवादी ठरवल्यामुळे कर्नाटकातील काँग्रेसचे नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी त्या वेळी आक्षेप घेतला होता. त्यानंतर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने त्याच्याविरुद्ध पुरावे गोळा केले असता तो आतंकवादी असल्याचे उघड झाले होते. (अशा पक्षाला कर्नाटकातील हिंदूंनी मते देऊन सत्तेवर बसले आहे. भविष्यात कर्नाटकात अशा घटना घडल्या, तर आश्चर्य वाटू नये ! – संपादक)
संपादकीय भूमिकाभारताला हिंदु राष्ट्र करण्यावरून प्रश्न विचारणार्या काँग्रेसच्या नेत्यांना जिहादी आतंकवाद्याच्या घरी स्वतःचे पक्षाचे कार्यालय चालवणे चुकीचे वाटत नाही, यातून त्यांची मानसिकता काय आहे ? हे लक्षात येते ! |