विद्यार्थ्याशी आई-मुलाचे नाते असल्याचा मुख्याध्यापिकेचा दावा
बेंगळुरू (कर्नाटक) – सहलीच्या वेळी इयत्ता १० वीतील विद्यार्थ्यासमवेत आक्षेपार्ह छायाचित्रे काढल्याच्या प्रकरणी कर्नाटकातील मुरुगमल्ला येथील एका शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले आहे. या छायाचित्रांमध्ये मुख्याध्यापिका आणि विद्यार्थी एकमेकांना मिठी मारतांना आणि गालाचे चुंबन घेतांना दिसत आहेत. ही छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
शाळेच्या व्यवस्थापनाने मुख्याध्यापिका पुष्पलता आर्. यांना या छायाचित्राविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की, छायाचित्रामध्ये दिसणार्या विद्यार्थ्याशी तिचे आई-मुलाचे नाते आहे.
संपादकीय भूमिकाअशा मुख्याध्यापिका विद्यार्थ्यांवर कसले संस्कार करणार ? |