Karnataka Bolldozer On Hindu Mutt : २५० मुसलमानांनी नेल्लूर मठाच्या भूमीवर चालवला बुलडोझर !

  • न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिल्याची बतावणी करत जामिया मशिदीच्या सदस्यांनी केली कारवाई !

  • १४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद

नेल्लूर मठ-जामिया मशीद यांच्यातील दोन दशकांचा संघर्ष शिगेला !

चिक्कमगळुरू (कर्नाटक) : येथील नेल्लूर मठ-जामिया मशीद यांच्यातील दोन दशकांचा संघर्ष आता शिगेला पोचला आहे. ४ मार्चला शहरातील हनुमंतप्पा सर्कलजवळ मशिदीच्या सदस्यांनी ‘कर्नाटक उच्च न्यायालयाने आमच्या बाजूने आदेश दिला आहे’, असे सांगत, नगरपालिकेला कोणतीही माहिती न देता वादग्रस्त जागेवरील मठ, घरे आणि हॉटेल हटवण्यास आरंभ केला. २५० हून अधिक मुसलमानांना एकत्र करून बुलडोझरचा वापर करून ही कारवाई करण्यात आली.

१. ही भूमी नेल्लूर मठाची असल्याचा नेल्लूर मठ कुटुंबाचा दावा आहे, तर ही भूमी मुसलमानांची असल्याचा जामिया मशिदीचा दावा आहे. बुलडोझरच्या कारवाईमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

२. बुलडोझर फिरवला जात असतांना नेल्लूर मठ कुटुंबीय, भाजप कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते घटनास्थळी पोचले होते. कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवत अतिक्रमण हटवण्याची कारवाई थांबवली.

३. या वेळी पोलीस अधीक्षक विक्रम आमटे यांनी मशिदीच्या सदस्यांना बैठकीसाठी उपस्थित रहाण्याचे निर्देश दिले. या बैठकीत हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्तेही सहभागी झाले होते.

४. बैठकीत पोलिसांनी जामिया मशिदीच्या सदस्यांना ‘पोलिसांना आणि नगरपालिकेला माहिती न देता अचानक कारवाई केली’ यावरून केवळ नाराजी व्यक्त केली.

५. ‘हटवलेले बांधकाम पुन्हा चालू करावे, हानीभरपाई द्यावी, बुलडोझर जप्त करावा आणि अतिक्रमण हटवणार्‍यांवर गुन्हा नोंद करावा’, अशा मागण्या या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी केल्या. या संदर्भात नेल्लूर मठ कुटुंबीय आणि हॉटेल मालक यांनी बसवनहल्ली पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे.

६. हिंदूंच्या वाढत्या दबावामुळे वक्फ बोर्डाच्या अधिकार्‍यांसह जामिया मशिदीच्या १४ सदस्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

  • १ सहस्र वर्षांपूर्वी महमूद गझनी याने हिंदूंची मंदिरे पाडण्यास चालू केल्यापासून आजपर्यंत त्याचे वंशज मठ-मंदिरे पाडत आहेत. ही परिस्थिती हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता स्पष्ट करते !
  • जर हिंदूंनी एखादा अनधिकृत दर्गा अथवा मशीद पाडण्याचा विचार जरी व्यक्त केला असता, तरी याच कर्नाटक पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई करून वर्षानुवर्षे तुरुंगात डांबले असते !