बेंगळुरू : अल्पवयीन बलात्कार पीडितेवर पोलीस हवालदाराने पुन्हा केला बलात्कार !

बेंगळुरू (कर्नाटक) – येथे एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला तिचा मित्र विकी याने विवाहाचे वचन देऊन तिच्यावर बलात्कार केला आणि तिचे लैंगिक शोषणही केले. याची माहिती तिच्या कुटुंबियांना कळताच त्यांनी बोमन्नाहळ्ळी येथील पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. तेथील एक हवालदार अरुण याने ‘तुला न्याय मिळेल. तू घाबरू नकोस’, असे सांगितले आणि तिला हॉटेलवर बोलावून तिच्यावर बलात्कार केला.
पीडितेने आरोप केला की, हवालदार अरुण याने तिला नशेचे औषध घालून मद्य प्यायला दिले आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. शुद्धीवर आल्यानंतर तिला सांगितले की, तू कुठे बोललीस, तर तुझा अश्लील व्हिडिओ सर्वत्र प्रसारित करीन. पीडितेने न घाबरता सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर तिचा मित्र विकी आणि अरुण या दोघांना अटक करून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

  • कुंपणानेच शेत खाण्याचा हा संतापजनक प्रकार होय. अशा पोलिसांना फाशीची शिक्षाच केली पाहिजे !
  • कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजवणारी काँग्रेस सत्तेत असलेले कर्नाटक राज्य !