Andhra BJP Demands : तिरुपति मंदिरातील १ सहस्र अहिंदु कर्मचार्‍यांना काढण्याची मागणी !

मंदिर समिती मुख्यमंत्र्यांना भेटणार !

नवी देहली – आंध्रप्रदेश भाजपने ‘तिरुमला तिरुपति देवस्थानम् (टीटीडी)’मधील १ सहस्र अहिंदु कर्मचार्‍यांना काढण्याची मागणी केली आहे. आंध्रप्रदेश भाजपचे प्रवक्ते आणि ‘टीटीडी’चे सदस्य भानू प्रकाश रेड्डी म्हणाले की, देवस्थान समितीचे सदस्य १४ फेब्रुवारी या दिवशी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची भेट घेतील आणि त्यांना मंदिरातील सेवांमधून अहिंदूंना काढण्याची विनंती करतील.

‘टीटीडी’ने नुकतेच मंदिरातील १८ अहिंदु कर्मचार्‍यांना काढल्याची माहिती दिली होती. या सर्वांना ‘टीटीडी’च्या नियमांविरुद्ध काम केल्याविषयी दोषी ठरवण्यात आले होते. मंदिर व्यवस्थापनाने या कर्मचार्‍यांसमोर २ अटी ठेवल्या आहेत, एक म्हणजे त्यांनी दुसर्‍या सरकारी विभागात स्थानांतरित व्हावे किंवा दुसरे म्हणजे स्वेच्छा निवृत्ती स्वीकारावी. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे देवस्थानम् मंडळाने सांगितले होते.