हिंदूंनो, काँग्रेसचा डाव ओळखा आणि संघटित व्हा !

Congress

‘भाजप राज्यघटनेत पालट करणार’, अशी ओरड लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस nआणि इतर पक्ष करत होते. प्रत्यक्षात असे काहीही नव्हते, तरीही खोटी कथानके (नॅरेटिव्ह) प्रसारित करून काँग्रेसने मते मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ती यशस्वी झाली. हीच काँग्रेस आता मुसलमानांना आरक्षण देण्यासाठी राज्यघटनेत पालट करण्याची भाषा करत आहे, म्हणजे हा तिचा निवडणूक जिंकण्यासाठीचा ‘फार्स’ आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी ‘भाजप राज्यघटनेत पालट करणार’, अशी ओरड करणारे पक्षही आता मूग गिळून बसलेले आहेत. काँग्रेसच्या भूमिकेवर त्यांनी कुठल्याही प्रकारे विरोध केला नाही, म्हणजे या पक्षांचे, तसेच काँग्रेसचे राज्यघटनेवरील प्रेम बेगडी आहे, हे यातून स्पष्ट होते.

श्री. धैवत वाघमारे

जनतेने याचा सर्व स्तरांवर विरोध केला पाहिजे. काँग्रेसचे नेते जिथे भेटतील, तिथे त्यांचा निषेध केला पाहिजे. गेल्या ३-४ वर्षांपासून मुसलमानांना आरक्षण देण्यासाठी काँग्रेस वेळोवेळी वक्तव्य करतच आहे. ही वक्तव्ये हे स्पष्ट करतात की, काँग्रेसला मुसलमानांना चुचकारणे आवश्यक आहे; कारण तीच तिची ‘व्होट बँक’ (मतपेढी) आहे. त्यामुळे हिंदूंनो, एक व्हा, एकत्र रहा आणि काँग्रेस अन् पुरोगामी यांना मतपेटीद्वारे धडा शिकवा ! ‘तुम्ही एक राहिलात, एकजुटीने वागला, तरच हा हिंदुस्थान हिंदूंचा राहील, अन्यथा हे राष्ट्र कधी ‘इस्लामी’ घोषित करण्यात येईल’, हे सांगता येणार नाही. हिंदू आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांनी आताच हा धोका ओळखून सावध व्हायला हवे ! संघटित व्हायला हवे ! लक्षात घ्या, ‘संघटन हाच एकमेव पर्याय आहे !’ (२५.३.२०२५)

– श्री. धैवत वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.