सोलापूर शहरातून मागील दीड वर्षांत ११४ अल्पवयीन मुलींचे अपहरण !

एवढ्या मोठ्या संख्येत मुलींचे अपहरण होणे पोलिसांना लज्जास्पद ! पोलिसांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण करणे आवश्यक आहे !

शरीयत कायद्यातील एकतर्फी तलाकची प्रक्रिया रहित करा ! – क्रिकेटपटू महंमद शमी यांची पत्नी

समलैंगिक विवाहांपेक्षा ‘तलाक’ देण्याच्या कुप्रथेच्या माध्यमातून मुसलमान महिलांवरील होत असलेला अन्याय हा पुष्कळ गंभीर विषय असून न्यायालयाने हा विषय लवकरात लवकर निकाली काढावा, असेच संवेदनशील जनतेला वाटते !

‘द केरल स्टोरी’ चित्रपटातील अभिनेत्री अदा शर्मा यांचा अपघात

माझ्या अपघाताविषयीचे वृत्त सामाजिक माध्यमांत प्रसारित झाल्यामुळे मला असंख्य लोक संपर्क करून माझी विचारपूस करत आहेत. आम्ही सर्व जण सुखरूप आहोत. कोणतीही गंभीर बाब नाही. कुठलीही चिंता नसावी. तुम्ही दाखवलेल्या काळजीसाठी आभार.

पटियाला गुरुद्वारामध्ये महिलेची हत्या : मारेकर्‍याला अटक

महिला दारू पित असतांना गुरुद्वाराच्या कर्मचार्‍यांनी तिला चौकशीसाठी गुरुद्वाराच्या व्यवस्थापकाच्या खोलीत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा महिलेने कर्मचार्‍यांवर दारूच्या बाटलीने आक्रमण केले. त्याच वेळी निर्मलजीत सिंह तेथे आला आणि त्याने ५ गोळ्या झाडून तिची हत्या केली.

तळेगाव (पुणे) पोलीस ठाण्यावर महिलांचा मोर्चा !

१३ मे या दिवशी सायंकाळी किशोर आवारे समर्थक काही महिलांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.

४१ सहस्रांहून अधिक महिला बेपत्ता होणे, हे गुजरात पोलिसांना लज्जास्पद !

 ‘गुजरातमधून वर्ष २०१६ ते २०२० या ५ वर्षांत ४१ सहस्रांहून अधिक महिला बेपत्ता झाल्या आहेत, अशी माहिती ‘राष्ट्रीय गुन्हे नोंदणी आयोगा’च्या अहवालातून समोर आली आहे.’ 

मुंबई शहरात १७ ठिकाणी ‘हिरकणी कक्ष’ उभारणार !

सार्वजनिक ठिकाणी तान्ह्या बाळाला दूध पाजतांना महिलांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी राज्याच्या महिला आणि बाल कल्याण विकास विभागाने मुंबई शहरात १७ ठिकाणी ‘हिरकणी कक्षा’ची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भोपाळ (मध्यप्रदेश) येथील महिला सरकारी अभियंत्याकडे सापडली उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती !

भ्रष्टाचार्‍यांची समाजात छी थू होईल, असे करण्यासाठी जनतेने सरकारला भाग पाडल्यासच भ्रष्टाचाराला आळा बसेल !

पुतिन यांच्या पालकांचा अवमान केल्याच्या प्रकरणी रशियातील महिलेला २ वर्षांचा कारावास !

येथील न्यायालयाने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या आई-वडिलांचा अवमान केल्याच्या प्रकरणी एका महिलेला २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

सांगलीत ‘नीट’ परीक्षेसाठी विद्यार्थिनींना कपडे आणि अंतर्वस्त्रे उलटी घालून परीक्षा देण्यास भाग पाडले !

जिल्हा प्रशासनाने झालेल्या प्रकाराचे अन्वेषण करून यात जे कुणी दोषी असतील, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे !