|
भोपाळ (मध्यप्रदेश) – येथील पोलीस गृहनिर्माण महामंडळात कार्यरत असलेल्या महिला साहाय्यक अभियंत्या (कंत्राटी) हेमा मीना यांच्या शेतघरावर लोकायुक्त पोलिसांनी धाड घातली या वेळी पोलिसांना मीना यांच्याकडे त्यांच्या उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती आढळून आली. प्रतिमास केवळ ३० सहस्र रुपये वेतन असणार्या मीना यांच्या बंगल्यात आढळलेल्या एका टीव्हीची किंमत तब्बल ३० लाख रुपये आहे. त्यांनी गेल्या १३ वर्षांच्या नोकरीत उत्पन्नापेक्षा २३२ टक्के अधिक संपत्ती गोळा केली आहे.
हेमा मीना या त्यांच्या वडिलांच्या नावे असणार्या २० सहस्र चौरस फूट जागेवर बांधलेल्या तब्बल ४० खोल्यांच्या बंगल्यात रहातात. त्यांच्याकडून परदेशी जातीचे ५० हून अधिक कुत्री आहेत. विविध जातींच्या अनुमाने ७० गायीही आढळून आल्या. या बंगल्यात चपाती बनवण्याचे यंत्रही सापडले आहे. २ लाख ५० सहस्र रुपये किमतीचे हे यंत्र कुत्र्यांसाठी चपात्या बनवण्यासाठी वापरले जाते.
संपादकीय भूमिका
|