‘द केरल स्टोरी’ चित्रपटातील अभिनेत्री अदा शर्मा यांचा अपघात

चित्रपटच्या चमूतील अन्य सदस्यही अपघातात घायाळ

करीमनगर (तेलंगाणा) – प्रचंड लोकप्रियता लाभलेल्या ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटातील अभिनेत्री अदा शर्मा यांचा अपघात झाला. शर्मा आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक सुदिप्तो सेन हे चित्रपटाच्या चमूसह १४ मे या दिवशी करीमनगर येथे ‘हिंदु एकता यात्रेत’ सहभागी होण्यासाठी जाणार होते; मात्र रस्त्यात त्यांच्या वाहनाचा अपघात झाला.

या अपघातात काही काही सदस्य घायाळ झाल्याने उपचारार्थ त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. अदा शर्मा यांनीच ट्वीट करत ही माहिती दिली.

त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे, ‘मी ठीक आहे. माझ्या अपघाताविषयीचे वृत्त सामाजिक माध्यमांत प्रसारित झाल्यामुळे मला असंख्य लोक संपर्क करून माझी विचारपूस करत आहेत. आम्ही सर्व जण सुखरूप आहोत. कोणतीही गंभीर बाब नाही. कुठलीही चिंता नसावी. तुम्ही दाखवलेल्या काळजीसाठी आभार.’