गुरुद्वाराच्या परिसरात महिला दारू पित बसली असल्याचा आरोप

अमृतसर (पंजाब) – पटियाला गुरुद्वारामध्ये १४ मे या दिवशी निर्मलजीत सिंह नावाच्या व्यक्तीने एका महिलेची गोळ्या झाडून हत्या केली. महिला ‘गुरुद्वारा दुःख निवारण साहिब’च्या परिसरात तलावाजवळ दारू पित बसली होती, असा आरोप आहे. परविंदर कौर असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. या गोळीबारात एक सेवेकरीही घायाळ झाला आहे. मारेकरी सिंह हा पटियाला येथील रहिवासी असून त्याला अटक करण्यात आली आहे.
गुरुद्वारे में शराब पी रही महिला की सेवादार ने गोली मार कर की हत्या, एक अन्य घायल, आरोपी गिरफ्तार #news #dailyhunt https://t.co/J4OsWgCjFY
— Dailyhunt Hindi (@DH_Hindi) May 15, 2023
संबंधित ३२ वर्षीय महिला दारू पित असतांना गुरुद्वाराच्या कर्मचार्यांनीही तिला रोखण्याचा प्रयत्न केला. ते महिलेला चौकशीसाठी गुरुद्वाराच्या व्यवस्थापकाच्या खोलीत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा महिलेने कर्मचार्यांवर दारूच्या बाटलीने आक्रमण केले. त्याच वेळी निर्मलजीत सिंह तेथे आला आणि त्याने महिलेवर एकापाठोपाठ एक अशा ५ गोळ्या झाडून तिची हत्या केली.
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court