सोलापूर – मागील दीड वर्षात शहरातून ११४ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात करण्यात आल्या आहेत. त्यांतील १०१ मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. उर्वरित १३ मुलींचा अद्याप शोध लागलेला नसून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. पळवून नेण्यामध्ये १४ ते १७ वयोगटांतील मुलींचे प्रमाण अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणांमध्ये अपहरणाचा गुन्हा नोंद केला जातो. पोलिसांकडून मुलींचा शोध घेतल्यानंतर बहुतांश घटनांत ती मित्रासमवेत पळून गेल्याचे आढळून येते. (पालकांनी मुलींचे समुपदेशन करण्यासह त्यांच्यावर संस्कार केले पाहिजेत ! – संपादक)
एका वर्षात ५८५ महिला बेपत्ता !
जानेवारी ते डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये शहरातील ८५८ महिला बेपत्ता झाल्या आहेत. बेपत्ता ८५८ मधील ५४१ महिलांना शोधण्यात यश आले आहे; तर उर्वरित महिलांचा शोध अद्याप लागलेला नाही. मागील ४ मासांमध्ये शहरात ११८ महिला निघून गेल्याची नोंद असून त्यांतील ७३ महिलांचा शोध लागला आहे.
संपादकीय भूमिका
|