मुंबईत दिवसाला सरासरी ४ मुलींचे अपहरण !

प्रतिदिन सरासरी ४ मुलींचे अपहरण होत असल्याचे समोर येत आहे. दिवसाला बलात्काराचे सरासरी दोन गुन्हे नोंदवले जात आहेत, तर प्रतीदिन ५ महिला विनयभंगाच्या तक्रारी नोंदवत आहेत

महिलेला वारंवार धक्का देणे म्हणजे गुन्हा असून तसे करणार्‍याला कारावास

महिलेला वारंवार धक्का देणे म्हणजे गुन्हाच आहे, हा महत्त्वपूर्ण निर्णय विशेष पोक्सो न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी महिलांना वारंवार धक्का देणार्‍या पुरुषांची तक्रार दिल्यास त्यांची रवानगी कारागृहात होणार आहे.

परळ-एलफिन्स्टन पूल दुर्घटनेच्या वेळी पीडित महिलेसमवेत अश्‍लील चाळे झाल्याचे उघड

परळ-एलफिन्स्टन पुलावर चेंगराचेंगरी झाल्याची दुर्घटना घडल्यानंतर एका पीडित महिलेसमवेत अश्‍लील चाळे झाल्याचे उघड झाले आहे. त्या ठिकाणी काही लोकांनी साहाय्याच्या नावाखाली लज्जास्पद कृत्य केल्याचे समोर आले आहे.

विवाहितेला पैशांचे आमीष दाखवून देहविक्रीच्या व्यवसायास भाग पाडणार्‍या धर्मांधांना अटक

बंगालमधून कल्याणमध्ये कामासाठी आलेल्या अल्पवयीन विवाहितेला पैशांचे आमीष दाखवून देहविक्रीच्या व्यवसायासाठी बीड येथे नेणार्‍या ताजमुल शेख आणि युनूस शेख या धर्मांधांना कल्याण येथून, तर अन्य २ महिलांना बीड येथून अटक करण्यात आली.

मणीपूरमध्ये मृत ख्रिस्ती महिला वेगळ्या पंथातील असल्याने मृतदेहाचे दफन करण्यास नकार

मणीपूर राज्यातील उख्रुल जिल्ह्यात असलेल्या लीन्गांग्चींग गावातील एका आदिवासी महिलेचा ७ ऑगस्ट या दिवशी मृत्यू झाला.

हरियाणा येथे गोतस्करांचा पाठलाग करणार्‍या महिलांवर गोळीबार केला आणि जिवंत गाय फेकली

ब्रिटीश नागरिक असलेल्या सोनिया शर्मा आणि त्यांची मैत्रीण आर्ची बारानवाल यांच्यावर हरियाणातील सोहाणा रोड, गुरुग्राम येथे गोतस्करांनी आक्रमण केले. या वेळी गोतस्करांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

तहेलकाचे संस्थापक संपादक तरुण तेजपाल यांच्या विरोधातील बलात्काराचा आरोप निश्‍चित

तहेलकाचे संस्थापक संपादक तरुण तेजपाल यांनी सहकारी पत्रकार महिलेवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी गोव्यातील म्हापसा येथील सत्र न्यायालयाने आरोप निश्‍चित केले आहेत. या खटल्याची सुनावणी आता चालू होणार आहे. 

भाग्यनगर येथे अल्पवयीन मुलींची विक्री करणार्‍या आणखी चौघांना अटक

भारतातील अल्पवयीन मुलींची विक्री केल्याच्या प्रकरणी एक भारतीय काझी आणि ३ अरबी नागरिक यांना अटक करण्यात आली आहे. भाग्यनगर येथील पोलीस उपायुक्त व्ही. सत्यनारायण यांनी ही माहिती दिली.

बलात्कारप्रकरणी धर्मांध इब्राहिम मुजावर अटकेत !

सुभाषनगर येथील १७ वर्षांच्या अल्पवयीन युवतीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी धर्मांध इब्राहिम हनिफासाहब मुजावर (वय ३६ वर्षे) याला अटक केली आहे.

बनारस हिंदू विश्‍वविद्यालयातील हिंसाचार पूर्वनियोजित कट ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

बनारस हिंदू विश्‍वविद्यालयात झालेला हिंसाचार हा पूर्वनियोजित कट होता. या हिंसाचारामागे समाजकंटकांचा हात आहे, अशी माहिती उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. तसेच या घटनेच्या मुळाशी जाऊन तपास करावा;


Multi Language |Offline reading | PDF