|
पाटलीपुत्र (बिहार) – राज्याच्या सीमांचल भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये ख्रिस्ती मुले हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत आहेत. धर्मांध मुसलमानांच्या ‘लव्ह जिहाद’सारखे षड्यंत्र रचून आधी हिंदु मुली अन् त्यानंतर त्यांचे कुटुंबीय यांचे धर्मांतर केले जात आहे. एका राष्ट्रीय हिंदी वृत्तपत्राने यासंदर्भात केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये ही माहिती समोर आली.
या जिल्ह्यांना करण्यात आले लक्ष्य !
अररिया, कटिहार, किशनगंज, पूर्णिया, भागलपूर, मधेपुरा आणि बेगूसराय यांसारख्या जिल्ह्यांमध्ये साक्षरता दर अल्प असल्याने येथील हिंदूंचा बुद्धीभेद करणे सोपे आहे. त्यामुळे ख्रिस्ती मिशनर्यांनी प्राधान्याने या जिल्ह्यांनाच लक्ष्य केले आहे. या जिल्ह्यांतील अनेक गावांमध्ये वर्ष १९९९ ते २००५ या कालावधीत चर्चची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेली. त्यातही प्रामुख्याने शहरांऐवजी गावांवरच लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मधेपुरा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये ख्रिस्त्यांची लोकसंख्या ४० ते ६० टक्क्यांपर्यंत पोचली आहे. येथील मुरलीगंज क्षेत्रातील तिनकोनवा गाव, हे त्याचे उदाहरण असून राजधानी पाटलीपुत्रपासून २६० किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात एकूण १ सहस्र ४०० घरे आहेत. हे गाव शिक्षणाच्या संदर्भात अत्यंत मागास आहे. येथील लोकसंख्या ६० सहस्र असली, तरी येथील चर्चची संख्या आश्चर्यकारक गतीने वाढत गेली आहे. येथे इयत्ता ८ वी पर्यंतचे शिक्षण देणारी एक शाळा मिशनर्यांची आहे. एक रुग्णालयही ख्रिस्तीच चालवत आहेत.
हिंदूंना ख्रिस्ती बनवणे, ही देशाची ‘शांतपणे केलेली हत्या’च ! – विहिंप
याविषयी विश्व हिंदु परिषदेचे स्थानिक नेते विवेक कुमार म्हणाले की, गेल्या काही कालावधीत हिंदु मुलींनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याच्या घटनांमध्ये पुष्कळ वाढ झाली आहे; परंतु आम्ही गेल्या ३ वर्षांत २ सहस्र ५०० लोकांची घरवापसीही (मूळ धर्मात परत आणणे) केली आहे. ‘आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद बिहार’चे वरिष्ठ उपाध्यक्ष जवाहर झा यांचे म्हणणे आहे की, हिंदूंना ख्रिस्ती बनवणे, ही देशाची ‘शांतपणे केलेली हत्या’ आहे. याचे कारण असे की, धर्मांतराचे प्रकार बातम्यांच्या रूपात कुठेही समोर येत नाहीत, तसेच कुठलाही गाजावाजा होत नाही. ख्रिस्ती मिशनरी प्रामुख्याने गरीब हिंदु कुटुंबांना लक्ष्य करतात.
असे केले जात आहे धर्मांतर !
१. सुनीता नावाची एक महिला १७ वर्षांची असतांना जॉन नावाच्या एका ख्रिस्ती युवकाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. सुनीता त्याच्यात एवढी अडकली की, तिने घरातून पळून जाऊन त्याच्याशी विवाह केला. जॉनच्या कुटुंबियांनी तिचे धर्मांतर केले.
२. अधिक भयावह उदाहरण माया नावाच्या महिलेचे आहे. एका ख्रिस्ती मुलाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी विवाह रचला. तिचे धर्मांतर केले आणि त्याच्यापासून तिला दोन मुले झाल्यानंतर त्याने तिला सोडून दिले.
३. सीमांचल भागात अशी शेकडो उदाहरणे आहेत, ज्यामध्ये हिंदु मुली ख्रिस्त्यांच्या या ‘लव्ह जिहाद’च्या सारख्या षड्यंत्रात अडकल्या.
४. राज्यातील विविध ग्रामीण क्षेत्रांत शाळा आणि आरोग्य केंद्रे येथे काम करणारे लोक प्रामुख्याने हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठीच कार्यरत असतात. लोकांच्या मनात हळूहळू ख्रिस्ती धर्माचे महत्त्व बिंबवून त्यांचे धर्मांतर केले जाते. त्यानंतर अचानक त्या गावात चर्चची संख्या वाढू लागते.
५. आर्. हॅम्ब्रम आणि त्याची मूळची हिंदु पत्नी ललिता यांच्याकडे तिनकोनवा गावाचे ख्रिस्तीकरण करण्याचे दायित्व आहे. ललिताने यासंदर्भात माहिती देतांना सांगितले की, येथे अनेक ख्रिस्ती मुलांनी हिंदु मुलींशी प्रेम करून त्यांच्याशी विवाह करण्यासाठी त्यांना ख्रिस्ती बनवले. प्रार्थनासभा आणि संगीत यांच्या माध्यमातून लोकांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.
६. सरिता नावाची एक ख्रिस्ती महिला सहरसा जिल्ह्यात त्याच्या पतीसमवेत ख्रिस्ती धर्मांतराचे कार्य करत असून तिने हे मान्य केले की, प्रेमाच्या माध्यमातून मुलींच्या धर्मांतराचे प्रकार आता वाढले आहेत.
७. चर्चमध्ये हिंदु मुलीचा विवाह केल्यानंतर ३२ व्या दिवशी तिचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर केले जाते. विवाहाच्या आधी साधारण ६ महिने ते एक वर्ष मुलीला ख्रिस्ती धर्मातील चालीरिती शिकवल्या जातात. एका अन्वेषणानुसार येथील एका गावात केवळ २ वर्षांत ३० ते ५० हिंदु कुटुंबांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास बाध्य करण्यात आले. हिंदु मुलीने धर्मांतर केल्यानंतर काही कालावधीतच तिचे माहेरचे कुटुंबही धर्मांतरित होते. ख्रिस्ती मिशनरी म्हणतात की, हिंदूंना ख्रिस्ती बनवल्यावर येशू ख्रिस्त खुश होतात.
Conversion Racket | Dhanbad News Today | Christian Missionaries In India | Bihar News | News18
(सौजन्य : CNN-News18)
संपादकीय भूमिका
|