चित्रपट अभिनेता मन्सूर अली खान याने हिंदु अभिनेत्रीविषयी केले अश्‍लाघ्य विधान !

राष्ट्रीय महिला आयोगाची तमिळनाडू पोलिसांकडे कारवाई करण्याची मागणी !

मुंबई – ‘लिओ’ चित्रपटात अभिनय करणारी अभिनेत्री त्रिशा कृष्णन् यांच्या संदर्भात अश्‍लाघ्य विधान करणारा अभिनेता मन्सूर अली खान याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी राष्ट्रीय महिला आयोगाने तामिळनाडू पोलिसांकडे केली. एका कार्यक्रमात मन्सूर अली खान याने त्रिशा कृष्णन् यांच्याविषयी म्हटले होते की, मला वाटले होते की, चित्रपटात एका शयनकक्षात झोपण्याचा प्रसंग असेल. मी तिला शयनकक्षात घेऊन जाईन. जसे मी पूर्वीच्या चित्रपटांमध्ये इतर अभिनेत्रींसमवेत केले आहे. मी अनेक चित्रपटांमध्ये अनेक बलात्काराचे प्रसंग केले असून ते माझ्यासाठी नवीन नाहीत; पण जेव्हा आम्ही चित्रीकरणासाठी काश्मीरला गेलो, तेव्हा त्यांनी मला त्रिशाला भेटूही दिले नाही.

अभिनेत्रीने व्यक्त केला संताप

खान याच्यासारखे लोक मानवजातीला अपकीर्त करतात ! – अभिनेत्रीने व्यक्त केला संताप

खान याच्या या विधानानंतर त्रिशा यांनी म्हटले होते की, मी माझ्या संपूर्ण कार्यकाळात त्याच्या समवेत पुन्हा कधीही काम करणार नाही. त्याच्यासारखे लोक मानवजातीला अपकीर्त करतात.

संपादकीय भूमिका

  • धर्मांध मुसलमान लौकिकतेच्या दृष्टीने कितीही मोठे झाले, तरी त्यांच्यातील वासनांधवृत्ती मात्र पालटत नाही, हेच यातून लक्षात येते !
  • आतापर्यंत खान याच्यावर पोलिसांनी स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित होते; मात्र हिंदुद्रोही द्रमुक सरकारच्या काळात असे होत नाही, हेच दिसून येते !