लातूर – येथील मौलाना (मुसलमान धर्मगुरु) इस्माईल करीम शेख याला एका विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली २ सप्ताहांपूर्वी अटक करण्यात आली होती. आता या मौलानावर बहिष्कार टाकण्यात आला असून त्यासंदर्भातील फलक शहरातील सर्व मशिदींबाहेर लावण्यात आले आहेत.
१. शहरातील मदनी चौक येथे वास्तव्यास असलेल्या मौलानाने एका तरुण महिलेच्या असाहाय्यतेचा अपलाभ घेत धाराशिव जिल्ह्यातील जत येथे आणि लातूर शहरातील तिच्या घरात वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. यासंबंधीचे ‘व्हिडिओ’ सामाजिक प्रसार माध्यमांतून प्रसारित झाले होते. त्यानंतर विवेकानंद चौक पोलीस ठाणे येथे मौलानाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
२. यापूर्वी संबंधित आरोपी आणि त्याच्या कुटुंबातील अन्य काही सदस्यांवर ५ वर्षांपूर्वीही असेच आरोप झाले होते. या संदर्भात ‘यंग मुस्लिम योद्धा’ संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात या मौलानाची ‘अंमलबजावणी संचालनालया’च्या (‘ईडी’च्या) माध्यमातून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.